World Telecommunication Day History and Significance: दूरसंचार म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने महत्त्वपूर्ण अंतरावर माहितीची देवाणघेवाण करणे. टेलिकम्युनिकेशनने जगाला एकत्र आणले आहे. यामुळे दूर अंतरावर राहणाऱ्या लोकांना अधिकाधिक एक्सेस मिळण्यास मदत झाली आहे. अंतरावरील माहितीची देवाणघेवाण अतिशय सोपी झाली असून दूरसंचारामुळे जग जवळ आले आहे. तथापि, एक्सेस आणि डिजिटल ज्ञानाच्या बाबतीत अजूनही विषमता आहे. टेलिकम्युनिकेशनचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या स्थापनेसाठी दरवर्षी १७ मे रोजी जागतिक दूरसंचार दिवस साजरा केला जातो. या वर्षीचा खास दिवस साजरा करताना येथे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
इ.स. १८६५ मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची स्थापना झाली, तेव्हा पहिल्या भारतीय टेलिग्राफ कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी करण्यात आली. २००५ मध्ये वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटीने संयुक्त राष्ट्रसंघाकडे १७ मे हा दिवस दरवर्षी जागतिक दूरसंचार दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी केली होती. म्हणूनच १७ मे रोजी जागतिक दूरसंचार आणि इन्फॉर्मेशन सोसायटी डे हे दोन प्रमुख कार्यक्रम साजरे केले जातात.
यंदाच्या जागतिक दूरसंचार दिनाची थीम शाश्वत विकासासाठी डिजिटल इनोव्हेशन (Digital Innovation for Sustainable Development) अशी आहे. हवामान बदलाशी लढण्यापासून ते उपासमार आणि दारिद्र्य निर्मूलनापर्यंत जगातील सर्वात महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मदत करू शकते. खरं तर, डिजिटल तंत्रज्ञान २०३० पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्यांतर्गत ७०% उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करू शकते. तरीही डिजिटल गॅप मुळे जगाच्या अनेक भागांमध्ये नावीन्य पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होतो. धोरणे, गुंतवणूक आणि डिजिटल कौशल्यांच्या अभावामुळे अनेक देशांना वेगाने बदलणाऱ्या डिजिटल लँडस्केपमध्ये टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे," असे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले आहे.
हा दिवस आयसीटीच्या विकास आणि अनुप्रयोगाने मिळविलेल्या यशांवर आणि उद्भवलेल्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डिजिटल समावेशन आणि शाश्वत विकास हे जागतिक दूरसंचार दिनाचे ध्येय आहे.
संबंधित बातम्या