International Teachers Day 2023 Celebration: आपल्या भारतात ५ सप्टेंबरला शिक्षण दिन साजरा होतो पण जगातील अनेक देशांमध्ये ५ ऑक्टोबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे शिक्षकांचे जीवनातील महत्त्व आणि गरज लक्षात आणून देणे आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानणे हा आहे. या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. दरवर्षी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवशी शिक्षकांचा सत्कार आणि आभार व्यक्त केले जातात. याशिवाय शिक्षकांना येणाऱ्या समस्यांवरही चर्चा केली जाते.
आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाची सुरुवात फ्रान्समध्ये १९६६ मध्ये झाली. हा तो काळ होता जेव्हा शिक्षकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता, त्यामुळे त्यांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच शिक्षकांसाठी काही विशेष अधिकार निर्माण करण्यासाठी युनेस्को ऑर्गनायझेशन ऑफ नॅशनल असोसिएशनने हा निर्णय घेतला होता. ज्या अंतर्गत ५ ऑक्टोबर १९६६ रोजी फ्रान्समध्ये एक करार झाला होता. त्याचे नाव होते 'Teaching to Freedom'. त्यानंतर शिक्षकांच्या परिस्थितीत बरीच सुधारणा दिसून आली. तेव्हापासून दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला.
जागतिक शिक्षक दिनानिमित्त युनेस्को नेहमीच एक थीम ठेवतात. यंदाही ठेवली आहे. जागतिक शिक्षक दिनानिमित्त, सर्व देशांमध्ये शिक्षण आणि शिक्षकांची स्थिती आणखी कशी सुधारता येईल यावर चर्चा आणि कार्य केले जाते. या वर्षाची म्हणजे २०२३ ची थीम आहे “शिक्षणातील परिवर्तनाची सुरुवात शिक्षकांपासून”.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)