World Teachers Day Wishes: जगभरातील शिक्षकांच्या सन्मानार्थ दरवर्षी ५ ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. जागतिक स्तरावर शिक्षकांची भूमिका आणि त्यांचे योगदान यांचा गौरव करण्यासाठी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात. जागतिक शिक्षक दिनाचा उद्देश शिक्षकांच्या योगदानाची प्रशंसा करणे आणि त्यांचा सन्मान करणे हा आहे. या दिवशी विशेषत: समाज घडवण्यात आणि येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करण्यात शिक्षकांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल लोकांना जागरूक केले जाते. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच देत नाहीत तर त्यांना एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळेच तुम्ही तुमच्या शिक्षकांना हे सुंदर शुभेच्छा संदेश पाठवून त्यांचे आभार व्यक्त करू शकता...
जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा-
''अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्त्वातून मूल्ये फुलविणार्या,
ज्ञानरुपी गुरुंना''
जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
''आमचं मार्गदर्शक होण्यासाठी…
आम्हाला प्रेरित करण्यासाठी…
आम्हाला आज जे आहोत ते बनवण्यासाठी…
तुमचे खूप खूप धन्यवाद…''
जागतिक शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
''जे आपल्याला शिकवतात,
आपल्याला समजवतात.
आपल्या मुलांचं भविष्य घडवतात.
माझे मित्र, गुरू आणि प्रकाश बनण्यासाठी धन्यवाद''
जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
''विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या
शिक्षकांना जागतिक शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुम्ही आम्हाला जीवनात योग्य दिशा दाखवलीत,
त्याबद्दल मनःपूर्वक आभार!
''तुमच्या शिकवणीतून मिळालेलं ज्ञान,
आमचं जीवन समृद्ध करणारं आहे.
तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच
यशाच्या शिखरावर पोहोचवेल.
जगातील शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“शिक्षणाच्या अमूल्य देणगीला
मान देणारा दिवस आला आहे.
तुम्ही जसे प्रेरित करता तसेच
आम्ही जीवनाच्या मार्गावर चालत राहू.
जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!”
“तुम्ही आम्हाला केवळ शिकवलं नाही,
तर जीवनात कसं उभं राहायचं हेही शिकवलं.
तुमचं आभार मानण्यासाठी शब्द अपुरे आहेत.
शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
''आदरणीय शिक्षक, तुमच्या ज्ञानाच्या दीपानेच
आम्ही जीवनातील प्रत्येक अंधाराशी लढू शकतो.
तुमच्या समर्पणाला सलाम आणि
जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“शिक्षक दिनाच्या दिवशी,
तुमच्या योगदानाचा उत्सव साजरा करतो.
तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशातच
आम्ही भविष्याची दिशादर्शकता प्राप्त केली आहे!”
जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक म्हणजेच एक अद्वितीय मार्गदर्शक
जो विद्यार्थ्यांना स्वप्नांच्या पंखा देतो.
तुमच्या प्रेरणेला सलाम आणि
जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!”
संबंधित बातम्या