World Suicide Prevention Day: कठीण काळात आत्महत्येचे विचार येऊन डिप्रेशन येतं, 'या' गोष्टी देतील सकारात्मक ऊर्जा-world suicide prevention day 2024 what to do if you have suicidal thoughts ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Suicide Prevention Day: कठीण काळात आत्महत्येचे विचार येऊन डिप्रेशन येतं, 'या' गोष्टी देतील सकारात्मक ऊर्जा

World Suicide Prevention Day: कठीण काळात आत्महत्येचे विचार येऊन डिप्रेशन येतं, 'या' गोष्टी देतील सकारात्मक ऊर्जा

Sep 10, 2024 09:28 AM IST

Tips to prevent suicidal thoughts: समस्यांशी लढत राहिल्यामुळे आणि त्या सोडवता न आल्याने हे लोक स्वतःला कमकुवत आणि असहाय्य समजू लागतात. पण प्रत्येक समस्येवर कोणता ना कोणता उपाय असतो.

World Suicide Prevention Day 2024-जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस २०२४
World Suicide Prevention Day 2024-जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस २०२४ (pexel)

How to get rid of mental stress:  कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण आपल्या समस्यांमध्ये अडकलो आहोत. आणि आता आपण यातून बाहेर पडू शकत नाही. त्यानंतर लोक काही चुकीची पावले उचलतात. अशावेळी आत्महत्येचा विचारही करतात. आणि या समस्यांमध्ये, लोक आपलं आयुष्य खूप कठीण आणि वाईट बनवतात. समस्यांशी लढत राहिल्यामुळे आणि त्या सोडवता न आल्याने हे लोक स्वतःला कमकुवत आणि असहाय्य समजू लागतात. पण प्रत्येक समस्येवर कोणता ना कोणता उपाय असतो. समस्या निर्माण झाली असेल तर त्यावर उपायही निघेल. अशा काळात तुम्ही धीर धरा, अस्वस्थता आणि घाबरून कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका. आत्महत्येसारख्या वाईट विचारांपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन (world suicide prevention day) साजरा केला जातो. जेणेकरून लोकांना जागरुक करता येईल.

आयुष्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गही सापडतो. भगवंताने दिलेल्या या आयुष्यातील आपल्या शरीराचे, व्यक्तिमत्वाचे रक्षण करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. पण अशा परिस्थितीत काय करावे, कोणाशी बोलावे, कसे बाहेर पडावे हे समजत नाही हे खरे आहे. या काळात नैराश्य आणि तणाव हे आपले सर्वात मोठे शत्रू बनतात. अशावेळी नैराश्यातून कसे बाहेर पडावे हे आपण जाणून घेऊया.

संवाद खूप महत्वाचा आह-

आयुष्य संपवण्यापेक्षा किंवा चुकीच्या दिशेने नेण्यापेक्षा बोलणे चांगले. तुमच्या भावना तुमच्या जवळच्या कोणाशी तरी शेअर करा, मग तो मित्र असो, कौटुंबिक सदस्य असो किंवा इतर विश्वासू व्यक्ती. तुमची समस्या व्यक्त केल्याने तुम्हाला हलके वाटेल आणि कदाचित तुम्हाला काही सूचना मिळतील ज्यामुळे तुम्हाला मदत होईल. जेणेकरून तुम्ही या विचारपासून स्वतःला प्रवृत्त कराल.

मेडिटेशन आणि योग-

स्वतःवर प्रेम करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी योग आणि मेडिटेशन हे मानसिक शांतीचे सर्वोत्तम साधन आहे. दररोज थोड्या वेळासाठी ध्यान किंवा योगासने केल्याने तुमचे मन शांत होते आणि तणावाचा सामना करण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची ताकद मिळते आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते.

मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका-

जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही या सर्व गोष्टी एकट्याने हाताळू शकत नाही, तर अशावेळी मानसिक तज्ज्ञांची मदत घेण्यात काही गैर नाही. अनेक वेळा, मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशक तुमची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि योग्य मार्गदर्शन देऊ शकतात. मदत मागणे ही तुमची कमजोरी नसून तुमची ताकद आहे. त्यामुळे तणावात मदत घेण्यास कधीही लाजू नका.

सकारात्मक विचार-

सर्वांनाच माहिती आहे की, हे सोपे नाही पण हळूहळू तुमची विचारसरणी सकारात्मक करणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्या समस्या इतक्या मोठ्या वाटत नाहीत. स्वतःवर विश्वास ठेवा की, तुम्ही या संकटातून बाहेर पडू शकता. शिवाय आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विचार करा अशाने तुम्हाला नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत होतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner