People With Suicidal Thoughts: जगभरात दररोज अनेक जण आत्महत्या करतात. आत्महत्येसारख्या वाईट विचारांपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन (world suicide prevention day) साजरा केला जातो. जेणेकरून लोकांना जागरुक करता येईल आणि अनेकांना मृत्यूच्या तोंडातून वाचवता येईल. प्रत्येकाचं आयुष्य सोपं नसतं.
अनेक चांगले-वाईट क्षण येतात. ज्याला काही लोक सामोरे जातात. पण आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे अनेक जण घाबरतात आणि आत्महत्येसारखा विचार करू लागतात. मरणे हाच सर्व समस्यांचा उपाय आहे, असे त्यांना वाटते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या माहितीनुसार, वर्ष २०२१ मध्ये देशभरात १ लाखांहून अधिक मृत्यू आत्महत्येमुळे झाले. जे २०२२ च्या तुलनेत सात टक्क्यांनी अधिक होते. जर तुमच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती तुम्हाला त्याच्या आत्महत्येचे विचार सांगत असेल तर तुम्ही त्याला काय बोलावे आणि काय बोलू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे.
आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांनी चुकूनही अशा गोष्टी बोलू नये.
- तुझ्याकडे आयुष्य जगण्यासारखं बरंच काही आहे. आत्महत्येचा विचार असलेल्या व्यक्तीला अशी टिप्पणी कधीही करू नये.
- जीवनाचे मूल्य सांगण्याचा किंवा जीवनाशी संबंधित तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करू नका. या गोष्टी माणसाला अधिकच अपराधीपणात टाकतात.
- आत्महत्या किंवा तणावासारख्या परिस्थितीला सामोरे गेलेल्या व्यक्तीला दुसऱ्याची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करू नका. या गोष्टींमुळे ही समस्या अधिकच वाढते.
- जर कोणी आत्महत्येचा प्लॅन सांगत असेल तर तो लपवण्याची शपथ घेण्यापेक्षा मेडिकल प्रोफेशनल्सची मदत घ्या. जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल.
जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या मनातील गोष्ट सांगितली असेल आणि आत्महत्येसारख्या विचाराचा उल्लेख करत असेल तर ताबडतोब सावध व्हा आणि असे बोला.
- त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका आणि विचारपूर्वक शब्द बोला. कठोर आणि कटू शब्द अजिबात वापरू नका. त्याला रागवू नका. तर प्रोफेशनल हेल्प घेण्यासाठी मार्गदर्शन करा.
- त्याला धन्यवाद म्हणा की त्याने तुमच्यावर विश्वास ठेवला.
- आत्महत्येच्या योजनेबद्दल विचारा जेणेकरून त्याला आत्महत्येपासून वाचवता येईल.
- एखाद्या मित्राने किंवा सहकाऱ्याने आत्महत्येचे विचार सांगितले असतील तर ते एकट्याने हाताळण्यापेक्षा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. जेणेकरून तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळू शकेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)