World Stroke Day: स्लीप एपनियामुळे वाढतोय स्ट्रोकचा धोका? कशी ओळखाल आजाराची लक्षणे? जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Stroke Day: स्लीप एपनियामुळे वाढतोय स्ट्रोकचा धोका? कशी ओळखाल आजाराची लक्षणे? जाणून घ्या...

World Stroke Day: स्लीप एपनियामुळे वाढतोय स्ट्रोकचा धोका? कशी ओळखाल आजाराची लक्षणे? जाणून घ्या...

Oct 28, 2024 04:04 PM IST

World Stroke Day 2024 : स्लीप एपनिया आणि स्ट्रोक टाळण्यासाठी, लोकांना दररोज व्यायाम करण्याचा, निरोगी वजन राखण्याचा, निरोगी झोपण्याच्या सवयींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो.

प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

World Stroke Day 2024 : पक्षाघात ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे, जी देशातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि त्यामुळे आयुष्यभर अपंगत्व येते. स्ट्रोक हे उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची उच्च पातळी, तणाव, बैठी जीवनशैली आणि अगदी स्लीप एपनिया यासारख्या विविध घटकांशी संबंधित आहे. शिवाय, स्ट्रोक हा उपचार न केलेल्या स्लीप एपनिया समस्येच्या धोकादायक आजारांपैकी एक आहे. स्लीप एपनियाचे व्यवस्थापन करण्यासाठी वजन नियंत्रित राखणे, धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे, दररोज व्यायाम करणे वायुमार्गावरील दाब योग्य रहावा यासाठी (CPAP) मशीन वापरणे आवश्यक आहे.

का येतो स्ट्रोक?

जेव्हा तुमच्या मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होतो, तेव्हा स्ट्रोकची समस्या उद्भवते. स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे इस्केमिक स्ट्रोक जो तुमच्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताच्या गुठळ्या किंवा प्लेक तयार झाल्यामुळे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा रोखत असलेल्या ब्लॉकेजेसमुळे होतो. तर, दुसरा प्रकार म्हणजे हेमोरेजिक स्ट्रोक ज्यामध्ये मेंदूतील रक्त गळते आणि रक्तवाहिनी फुटून मृत्यूही होऊ शकतो. स्ट्रोकमुळे एखाद्याच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा संबंध थेट मृत्यूशी आहे.

काय आहेत स्ट्रोकची लक्षणे?

पक्षाघाताच्या प्रमुख लक्षणांमध्ये, तोल जाणे, अचानक भुरकट दिसणे, एका बाजूचे तोंड वाकडे होणे, एक हात निष्क्रिय होणे, स्पष्ट बोलता न येणे आदींचा समावेश होत असतो. सांकेतिक भाषेत या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. म्हणूनच, अनुकूल परिणामांसाठी पहिल्या ३ ते ४ तासांत म्हणजेच गोल्डन अवरमध्ये उपचार केला गेला पाहिजे. सध्या स्लीप एपनिया हे स्ट्रोक येण्यामागचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे.

Women Health : प्रायव्हेट पार्ट्स काळवंडलेत? टेन्शन नका घेऊ! ‘या’ सोप्या टिप्सने त्वचा होईल पुन्हा चमकदार

काय आहे स्लीप एपनिया?

न्यूरोलॉजिस्ट डॉ. गिरीश सोनी म्हणतात, स्लीप एपनिया हा झोपेचा विकार, जो झोपेच्या वेळी श्वासोच्छवासावर परिणाम करतो. स्ट्रोक आल्याने स्लीप एपनिया होण्याची शक्यता अधिक असते. स्लीप एपनियाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) हा इस्केमिक स्ट्रोक म्हणून ओळखला जातो, ज्यात मेंदूला रक्त पोहोचवणारी रक्तवाहिनीचा रक्तपुरवठा कमी प्रमाणात झाल्याने या प्रकारचा पक्षाघात होत असतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया तेव्हा होतो, जेव्हा एखादी व्यक्ती झोपलेली असताना वरच्या श्वासनलिका अडथळा निर्माण होतो आणि श्वास घेण्यास अडचण येते. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया असणाऱ्या व्यक्ती घोरतात, सकाळी डोकेदुखी जाणवते आणि मूड स्विग्ज यासारखी लक्षणे देखील आढळतात. लठ्ठ लोकांना स्लीप एपनियाचा धोका अधिक असतो, ज्यामुळे त्यांना स्ट्रोकची शक्यता असते. एका महिन्यात, सुमारे १० पैकी ३-४ रुग्ण घोरणे, श्वासोच्छवासादरम्यान दम लागणे, वजन वाढणे आणि स्लीप एपनियामुळे थकवा यासारखी लक्षणांसह उपचाराकरिता येतात. स्लीप एपनियाच्या प्रकरणांमध्ये ४०%पेक्षा जास्त वाढ होत आहे. स्लीप एपनिया असलेल्या २०% लोकांना स्ट्रोकचा धोका असतो. ज्यांना स्लीप एपनियाची समस्या आहे, त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झोपेच्या विकारावर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज आहे.

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया

स्लीप एपनिया व्यवस्थापित करण्यासाठी आणि स्ट्रोक टाळण्यासाठी, लोकांना दररोज व्यायाम करण्याचा, निरोगी वजन राखण्याचा, निरोगी झोपण्याच्या सवयींचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. याचबरोबर धूम्रपान, अल्कोहोल आणि कॅफीनचे सेवन टाळणे आणि कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (CPAP) मशीनचा वापर करणे योग्य राहिल. यासोबतच मोकळा श्वास घ्या, वायुमार्गात अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. ज्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आहे, त्यांनी स्ट्रोकसारखे दुष्परिणाम टाळण्यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner