Ayurvedic Drinks for Better Sleep: दरवर्षी १५ मार्चे रोजी जागतिक निद्रा दिन साजरा केला जातो.जेणेकरून लोकांमध्ये झोपेबद्दल जागरूकता पसरवता येईल. चांगली आणि पुरेशी झोप हे आरोग्याचे रहस्य आहे. आजकाल अनेक लोक निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करणे आवश्यक आहे. रात्रभर नीट झोप लागत नसेल, अंथरुणावर नुसते पडून राहिल्याने त्रास होत असेल तर ही आयुर्वेदिक ड्रिंक्स प्या. यामुळे तुम्हाला लगेच झोप येण्यास मदत होईल.
जर तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी फक्त कॅफीन घेणे थांबवू नका तर त्याऐवजी ही आयुर्वेदिक ड्रिंक्स प्या. ज्यामुळे झोप येण्यास मदत होईल. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा देशी तूप मिक्स करा. तूप पूर्णपणे विरघळल्यावर ते प्या. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्यास मन शांत आणि आराम मिळण्यास मदत होते.
केशर आणि वेलची या दोन विशेष सुगंधी औषधी वनस्पती आहेत ज्यांचा आयुर्वेदात औषध म्हणून वापर केला जातो. एक ग्लास गरम दुधात काही केशर आणि वेलचीचे दाणे बारीक करून उकळा. आता हे कोमट दूध प्या. हे तुमचे शरीर आणि मनाला रिलॅक्स करण्यास मदत करेल.
अश्वगंधा हे तणाव आणि चिंतासाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक औषध मानले जाते. तणावामुळे झोप येत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधाची मुळे पाण्यात उकळून चहा बनवू शकता.हा चहा प्या. किंवा गरम दुधात अश्वगंधा पावडर मिसळून प्या.हे मन आणि मज्जासंस्थाला रिलॅक्स करण्यास मदत करते.
व्हॅलेरियन रूट टी झोप आणि निद्रानाशावर उपचार करण्यासाठी बराच काळ वापरला जातो. त्याचा चहा प्यायल्याने लवकर झोप लागण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या