Tips to improve eye sight: आपल्या जीवनशैलीशी संबंधित अनेक घटक आहेत, ज्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य देखील सतत बदलत आहे. दिवसा कॉम्प्यूटरवर काम करणे आणि नंतर रात्री उशिरा मोबाईल फोन पाहणे यामुळे सतत डोळ्यांना हानी पोहोचते. याशिवाय पौष्टिक आहाराचा अभाव आणि वेळोवेळी डोळ्यांची काळजी न घेतल्यानेही या समस्या उद्भवू शकतात. यामुळे डोळ्यांमध्ये अंधुकपणा, कोरडेपणा, जळजळ आणि दुहेरी दृष्टी यासारख्या समस्या उद्भवू लागतात. डोळ्यांकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे आणि म्हणूनच आज १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. जागतिक दृष्टी दिनानिमित्त आम्ही तुम्हाला आपल्या डोळ्यांचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती देणार आहोत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आजकाल बहुतेक काम मोबाईल आणि कॉम्प्युटरवर होत असल्याने लोकांना डोळ्यांशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वास्तविक, हे सतत पाहिल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर दबाव निर्माण होतो. यावेळी आपण डोळे मिचकावतो, त्यामुळे डोळ्यांतील ओलावा निघून जातो, काही वेळाने आपल्याला डोळ्यांमध्ये अंधुकपणाही जाणवतो. अशाप्रकारे डोळ्यांना इजा व्हायला सुरुवात होते.
खूप जास्त स्क्रीन टाइम म्हणजेच सतत स्क्रीनकडे पाहणे देखील डोळ्यांना हानी पोहोचवू शकते. यामुळे अंधुक दिसणे, डोळ्यांवर ताण, डोळ्यांमध्ये कोरडेपणा, डोकेदुखी, डोळा दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात, इतकेच नाही तर खांदे आणि मानदुखीदेखील होऊ शकते. एकंदरीतच तुमच्या संपूर्ण शरीरावर याचा वाईट परिणाम होतो.
डोळ्यांच्या काळजीसाठी, सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की मोबाईल किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवर जास्त वेळ बसू नका, झोपण्यापूर्वी सुमारे १ तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. लहान मुलांना अशा गॅजेट्सपासून दूर ठेवा आणि त्यांना ऑनलाइन गेम खेळण्याऐवजी मैदानात खेळण्यास प्रोत्साहित करा. याशिवाय खाद्यपदार्थांमध्ये हिरव्या भाज्या, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. चांगली झोप घ्या, जेणेकरून तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमच्या डोळ्यांनाही आराम मिळेल. याशिवाय तुम्ही दुसरा नियम अवलंबला पाहिजे, तुम्ही 20-20-20 नियमाचे पालन केले पाहिजे.
ही एक अशी पद्धत आहे जी तुमच्या डोळ्यांना या सर्व समस्यांपासून आराम देते आणि त्यांना सुरक्षित ठेवते. या नियमानुसार तुम्ही सतत कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर काम करत असाल तर 20 मिनिटांनंतर तुमचे लक्ष तिथून काढून टाका आणि 20 सेकंदांसाठी 20 फूट अंतरावर असलेल्या इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. हा व्यायाम केल्याने तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि तणावापासूनही आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही काम करत असताना हा व्यायाम दर 20-20 मिनिटांनी करा, याशिवाय तुम्ही जास्त वेळ कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप मोबाइलकडे पाहू नका, काही वेळाने तुमच्या पापण्या बंद करा आणि उघडत राहा. असे केल्याने डोळ्यांना काहीसा आराम मिळेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या