Signs of blood infection: १३ सप्टेंबर रोजी जगभरात सेप्सिस दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश सेप्सिस सारख्या धोकादायक वैद्यकीय स्थितीबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा आहे. यासोबत सेप्सिस टाळण्यासाठी उपायही जाणून घेणे गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इतर अनेक संस्थांच्या मदतीने, सेप्सिस टाळण्यासाठी लसीकरण आणि संसर्ग टाळण्यासाठी कार्य करते. जागतिक सेप्सिस दिनानिमित्त सेप्सिस म्हणजे काय आणि ते टाळण्यासाठी उपाय काय याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
सेप्सिस किंवा सेप्टिसिमिया म्हणजे रक्त संक्रमण होय. यामध्ये रक्तात फिरणारी केमिकल्स शरीरात सूज आणि जळजळ निर्माण करतात. त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे अनेक अवयव प्रभावित होतात. सेप्सिसचा धोकादायक प्रकार म्हणजे सेप्टिक शॉक होय. ज्यामध्ये रक्तदाब अचानक कमी होऊ लागतो. त्यामुळे गंभीर परिणाम पाहायला मिळतात. सामान्यतः, वृद्ध लोकांमध्ये आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये सेप्सिसची शक्यता जास्त असते.
सेप्सिसची लक्षणे ३ भागात विभागली जाऊ शकतात. सर्व प्रथम, सेप्सिसची काही प्रारंभिक लक्षणे दिसतात. ज्याच्या आधारावर रुग्णावर उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर लक्षणे आणि नंतर सेप्टिक शॉक होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत सुरुवातीची लक्षणे ओळखून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे.
-खूप वेगवान श्वासोच्छ्वास
-शरीराच्या तापमानात जलद बदल
-एका मिनिटात हृदयाचे ठोके ९० पेक्षा जास्त.
-श्वास घेण्यात अडचण येणे.
-कमी प्रमाणात लघवी होणे किंवा लघवी करताना वेदना होणे.
-पोटदुखी
-मानसिक आरोग्यामध्ये अचानक बदल
-हृदयाचे ठोके असामान्य होणे.
-विनाकारण घाम येणे
-डोकेदुखी
-थरथरणे
-संसर्गावर अवलंबून लक्षणे, जसे की न्यूमोनियामध्ये खोकला वाढणे-
सेप्सिसची लक्षणे म्हणजेच रक्त संसर्ग प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखा नसतो. अनेक वेळा मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसतात.
-जर रक्तातील संसर्ग सेप्टिक शॉकमध्ये बदलला असेल, तर खालील लक्षणे दिसतात:
-रक्तदाब वेगाने घटने
-उभे राहण्याची क्षमता नसणे
-खूप झोप लागणे किंवा जागे राहणे कठीण वाटणे
-मानसिक कार्यात अडचण, जसे की एखादी व्यक्ती खूप गोंधळून जाऊ लागते.
रक्त संक्रमण किंवा सेप्सिसमची कारणे-
-कोणत्याही प्रकारचे संक्रमण, मग ते व्हायरल, बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य असो. रक्तात पसरल्यास सेप्सिस होतो.
-फुफ्फुसातील न्यूमोनियामुळे सेप्सिस होऊ शकतो
मूत्रपिंड, मूत्राशय किंवा मूत्र प्रणालीमध्ये संक्रमण
पचनसंस्थेतील संसर्गामुळे सेप्सिस होऊ शकतो.
दुखापत किंवा जखमेमुळे रक्त संक्रमण होऊ शकते.
शस्त्रक्रियेमुळे सेप्सिसचा धोकाही असतो.
रक्तामध्ये संसर्ग पसरल्यास, त्वरित उपचार करणे फार महत्वाचे आहे. सेप्टिक शॉकच्या बाबतीत, रुग्णाला अनेकदा ऑक्सिजन सपोर्टवर ठेवावे लागते. परंतु साध्या सेप्सिसच्या बाबतीत विविध चाचण्यांसह औषधांच्या मदतीने उपचार केले जातात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)