देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. या कुटुंबातील सर्वच व्यक्ती कायमच चर्चेत असतात. सध्या अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्याकडे जगातील सर्व सुखसोयी असल्या तरी त्यांना साधे आयुष्य जगायला आवडते. मुकेश अंबानी यांच्या यशाबद्दल बोलायचे झाले तर त्यामागचे रहस्य म्हणजे त्यांची काही तत्त्वे. तुम्हालाही जर तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ यश मिळवायचे असेल तर मुकेश अंबानी यांच्या काही सवयी फॉलो कराव्या लागतील. चला पाहूया कोणत्या...
मुकेश अंबानी यांनी आयुष्यात स्वत:साठी कधीही छोटेसे ध्येय ठेवले नाही. काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी त्यांचा स्वत:वर नेहमीच विश्वास असायचा. ज्याचा परिणाम आज आपल्या सर्वांसमोर आहे. त्यांनी आपले ध्येय नेहमीच मोठे ठेवले आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमाचा आधार घेतला. आपले ध्येय साध्य करण्याची तळमळ त्यांच्यात कायम होती.
वाचा: अनंत आणि राधिकाच्या हळदी समारंभाला सलमान खानने घातलेल्या घड्याळाची किंमत माहिती आहे का?
मुकेश अंबानी यांचा टीमवर्कवर विश्वास असून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या यशाचे सर्वात मोठे रहस्य टीमवर्क आहे आणि त्यांच्याकडे सर्वोत्तम टीम आहे. ते जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये विराजमान आहेत.
मुकेश अंबानी यांचा असा विश्वास आहे की, कोणत्याही कामात तेव्हाच यश मिळेल जेव्हा तुम्ही त्या कामाबद्दल आपला विचार सकारात्मक ठेवाल. म्हणूनच त्यांना प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहणे आवडते. हे गुण त्याच्यात वडिलांमुळे त्यांच्याकडे आले आहेत.
वाचा: कार्टून नेटवर्क बंद होणार? सोशल मीडियावरील या ट्रेंडमागचे सत्य काय?
कोणताही यशस्वी माणूस नेहमीच गर्दीतून बाहेर पडण्यासाठी इतरांपेक्षा थोडा वेगळा विचार करत आणि मग यशाची पहिली पायरी चढतो असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. या यशासाठी त्याला गर्दीत धक्के खात उभे राहावे लागते तर कधी पाय घसरुन पडावे लागते. उद्योगपती मुकेश अंबानीही याच गुणाने परिपूर्ण आहेत. आज त्यांनी जगासमोर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुम्हालाही आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर अंबानींच्या या मंत्राचा आपल्या आयुष्यात नक्की समावेश करा.
वाचा: सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट
समस्यांवर तोडगा काढल्याने समस्या सुटत नाही. त्यापेक्षा त्या समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे असे मुकेश अंबानी सांगतात. एकदा समस्या कळली की तुम्ही स्वत: त्यावर उपाय शोधता. प्रोफेशनल लाईफ असो वा पर्सनल, कोणत्याही समस्येच्या मुळाशी पोहोचणं गरजेचं असतं, जेणेकरून त्यावर तोडगा निघू शकेल.
संबंधित बातम्या