मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Red Cross Day 2024: का साजरा केला जातो जागतिक रेडक्रॉस दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

World Red Cross Day 2024: का साजरा केला जातो जागतिक रेडक्रॉस दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 08, 2024 11:14 AM IST

World Red Cross Day 2024: दरवर्षी ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या.

World Red Cross Day 2024: का साजरा केला जातो जागतिक रेडक्रॉस दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
World Red Cross Day 2024: का साजरा केला जातो जागतिक रेडक्रॉस दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व (freepik)

History and Significance of World Red Cross Day: जगभरातील हजारो लोक नैसर्गिक आपत्ती, सशस्त्र संघर्ष आणि इतर संकटांनी ग्रस्त आहेत. त्यांची काळजी घेणे, आधार देणे आणि त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ते आपले घर, कुटुंब आणि आपल्या प्रियजनांना गमावतात. दुर्दैवी घटना एका सेकंदात त्यांचे आयुष्य बदलू शकतात. जागतिक रेडक्रॉस दिवस अशा संकटांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या आव्हानांना आणि संघर्षांना समर्पित आहे. हा दिवस रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीने जपलेल्या मानवतावादी मूल्यांची आठवण करून देतो. दरवर्षी ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करताना या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

जागतिक रेडक्रॉस दिनाचा इतिहास

पहिल्या महायुद्धानंतर रेड क्रॉसने शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. १९३४ साली टोकियो येथे झालेल्या १५ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युद्धादरम्यान जखमी झालेल्या सैनिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक तत्त्वांची रूपरेषा मांडणारा रेडक्रॉस युद्धविराम अहवाल सादर करण्यात आला. पुढे १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान हा प्रस्ताव अंमलात आणण्यात आला. १९४८ मध्ये, लीग ऑफ द रेड क्रॉस सोसायटीजच्या संचालक मंडळाने हेन्री ड्युनंट - रेडक्रॉस आणि इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस (ICRC) चे संस्थापक यांची जयंती साजरी करण्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हापासून दरवर्षी ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिवस साजरा केला जातो.

जागतिक रेडक्रॉस दिनाचे महत्व

यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाची थीम आहे - मी आनंदाने देतो आणि जो आनंद मी देतो तो बक्षीस आहे. (I give with joy, and the joy I give is a reward). हा दिवस लोकांना करुणा, प्रेम, आपुलकी, आधार आणि उपचारांच्या महत्त्वाबद्दल आठवण करून देतो. तसेच संस्थेची तत्त्वे, ध्येय, मूल्ये आणि उपक्रमांचे पालन करते. हा दिवस साजरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे रेडक्रॉससाठी निधी गोळा करणे आणि मानवतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने कार्य करणे. रक्तदान मोहीम असो, जनजागृती कार्यक्रम असो किंवा प्रथमोपचार शिकण्याची सत्रे असोत, गरजू लोकांना मदत कशी करावी हे शिकण्यासाठी आपण अशा कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग