What Is Scalp Psoriasis : स्काल्प सोरायसिस हा लक्षावधी लोकांवर परिणाम करणारा एक दीर्घकालीन आजार असून टाळूच्या त्वचेवरील लाल, पापुद्रे पडलेले चट्टे ही त्याची मुख्य ओळख आहे. याचे स्वरूप सौम्य, कोंड्यासारखी सालटं निघण्यापासून ते हेअरलाइनच्या बाहेर येणाया तीव्र स्वरूपाच्या उद्रेकांपर्यंत गंभीर असू शकतात. दिसण्याशी, बाह्यरूपाशी निगडित चिंतेव्यतिरिक्त स्काल्प सोरायसिसमुळे खाज येणे, अस्वस्थता आणि भावनिक ताण या समस्या निर्माण होऊ शकतात. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या मते स्काल्प सोरायसस हा सोरायसिसचा भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा प्रकार आहे, ज्याच्या रुग्णांचे प्रमाण अंदाजे ९ टक्के आहे. ही समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकत असली, तरीही याचे बहुतांश रुग्ण २०-४० वर्षे वयोगटात आढळून येतात. भारतामध्ये स्काल्प सोसायसिसवरील उपचारांना प्रती सेशन रु. ८,३०० ते रु. १६,००० इतका खर्च येतो, जो कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबाच्या उत्पन्नाहून खूपच अधिक आहे.
रोगप्रतिकारयंत्रणा अतिसक्रिय झाल्याने स्काल्प सोरायसिस उद्भवतो, ज्यामुळे त्वचेवरील पेशी असामान्य प्रमाणात वाढतात. या पेशी झडून जाण्याऐवजी अधिकच्या पेशींचा थर पृष्ठभागावर साचतो, ज्यामुळे तिथे जाड, खवल्यांसारखा प्लाक जमतो. पुढील गोष्टींमुळे स्काल्प सोरायसिसची समस्या अधिक गंभीर बनू शकते. जनुकीय पूर्वप्रवृत्ती, ताण आणि भावनिक असंतुलन, पर्यावरणीय घटक, जीवनशैलीशी निगडित सवयी (धूम्रपान आणि मद्यपान), टाळूला झालेला जंतूसंसर्ग आणि जखमा, उच्च रक्तदाबासाठीची किंवा दाहकारक औषधे यामुळे देखील स्काल्प सोरायसिस होऊ शकतो.
स्काल्प सोरायसिस असलेल्या व्यक्तींना त्वचेवर खाज येणे, त्वचेची आग आग होणे, त्वचा लालसर होणे आणि चंदेरी खवल्यांसारखे पापुद्रे येणे, ही लक्षणे दिसतात. यातून निघणाऱ्या पापुद्र्यांना कोंडा समजण्याची गल्लत होऊ शकते, पण स्काल्प सोरायसिस अधिक चिवट असतो. यावर उपचार न केल्यास तो कपाळ, मान आणि अगदी मानेपर्यंतही पसरू शकतो, ज्यामुळे समाजात वावरणे चिंतेचा विषय बनतो.
होमियोपॅथीच्या मदतीने स्काल्प सोरायसिसवर मूळांपासून उपचार करता येऊ शकतात. स्काल्प सोरायसिसची समस्या हाताळण्यासाठी होमियोपॅथी एक नैसर्गिक दृष्टिकोन देऊ करते, ज्यात समस्येच्या उद्रेकामागच्या मूळ कारणांवर उपचार करून लक्षणांच्या व ती परतण्याच्या शक्यतेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले जाते. होमियोपॅथीमध्ये व्यक्तीची लक्षणे आणि आजार बळावण्यासाठी निमित्त ठरणारी कारणे (ट्रिगर्स) यांच्यानुसार उपचार बेतले जातात व आजार वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या भावनिक आणि पर्यावरणीय घटकांनाही हाताळले जाते. नियमित होमियोपॅथिक उपचार रोगप्रतिकारसंस्थेच्या प्रतिसादांमध्ये संतुलन साधत आजाराचा उद्रेक (फ्लेअर-अफ) कमी करण्याचे लक्ष्य आखून केले जाते, ज्यामुळे आजार परतण्यास प्रतिबंध केला जातो. होमियोपॅथी उपचारांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, ज्यामुळे ते दीर्घकालीन वापरासाठी आदर्श आहेत.
स्काल्प सोरायसिस ही एक लवकर बरा न होणारी स्थिती असली तरीही योग्य उपचारपद्धतीच्या मदतीने तिचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य आहे. स्काल्प सोरायसिस जर हिवाळ्यामध्ये गंभीर स्वरूप धारण करत असेल, तर मेझेरियम होमियोपॅथिक औषध घेण्याचा सल्ला दिला जातो. याउलट तो उन्हाळ्यात बळावत असेल तर, काली एआरएस होमियोपॅथी औषध घेण्याची शिफारस केली जाऊ शकते. वरील होमियोपॅथिक औषधे ३० सीमध्ये ४ गोळ्या दिवसातून दोन वेळा अशा प्रमाणात, लक्षणे मागे हटेपर्यंत घ्यायला हवीत. औषध सुरू करण्यापूर्वी कृपया अर्हतापात्र होमियोपॅथचा सल्ला घ्यावा.
> सौम्य, सल्फेट-मुक्त शाम्पूंचा वापर करा आणि टाळूच्या त्वचेची आर्द्रता जपा.
> योगा, औषधोपचार आणि नियमित शारीरिक व्यायाम यामुळे ताणतणावाची निमित्ते दूर होऊ शकतात.
> मद्यपान आणि धूम्रपानाचे प्रमाण कमी करा आणि तुमच्या रोगप्रतिकारसंस्थेच्या आरोग्यात सुधारणा होईल, असा संतुलित आहार घ्या.
> टाळूला थंड हवामान, जखमा आणि कठोर रासायनिक उत्पादनांपासून सुरक्षित ठेवा.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या