World Poetry Day 2024 Marathi Kavita, Quotes, Wishes: कविता हा एक क्रिएटिव्ह प्रकार आहे जो लेखकांना खोलवर जाणवलेल्या भावना, अनुभव आणि आशा व्यक्त करण्याची संधी देते. आपल्याला जे वाटते आणि अनुभवत आहे असं बरेच काही तुम्ही कवितेने एक्स्प्रेस करू शकता. कविता दिन कवींना सन्मानित करतो आणि कवितेची कला, कविता वाचण्याची आणि कविता लिहिण्याची प्रथा पुनरुज्जीवित करण्याचा उद्देश आहे. हा दिवस साजरी करण्यासाठी, आपल्याला तारीख, इतिहास, महत्त्व आणि आपण तो का साजरा करतो हे माहित असणे आवश्यक आहे. याबद्दल जाणून घेऊयात तसेच या खास दिनानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला मराठीत मेसेज हवे असतील तर आम्ही या शुभेच्छा संदेश (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) घेऊन आलो आहोत.
युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) ने १९९९ मध्ये पॅरिस येथे ३० व्या सर्वसाधारण परिषदेत दरवर्षी जागतिक कविता दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी, अनेक देशांमध्ये ऑक्टोबरमध्ये हा दिवस साजरा केला जात होता. १९९९ मध्ये युनेस्कोच्या घोषणेनंतरही, काही देश अजूनही रोमन कवी व्हर्जिलच्या जन्मदिनी १५ ऑक्टोबर रोजी कविता दिन साजरा करतात.
>सुख वेचिन म्हणण्याआधी
घन दुःखाचा गहिवरतो
अन दुःख सावरू जाता
कवडसा सुखाचा येतो
या ऊन सावली संगे
रमण्यात ही मौज म्हणूनी
मी हसून हल्ली माझ्या
जगण्याला श्रावण म्हणतो
- गुरु ठाकूर
> प्रभातीच्या केशराची
कुणी उधळली रास
आणि वाऱ्यावर रंगला
असा केशरी उल्हास
रंगा गंधाने माखून
झाला सुखद शीतळ
आणि ठुमकत चालला
शीळ घालीत मंजुळ !!!!!
- इंदिरा संत
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतसुद्धा!
दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
- मंगेश पाडगावकर
>भेट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती
रिमझिम वर्षेतूनि लालसा
लाल दाटली होती
काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती
ओठांवरती उपचारांची
सभा थाटली होती
- कुसुमाग्रज
>कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात ,
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ,
साद घाली मना,
झोंबणारा हा गार वारा
शहारलेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या,
त्यावेळी लाभलेला तू
एक प्रेम किनारा!
(कविता क्रेडिट: सोशल मीडिया)