World Plant Milk Day: मोठमोठे सेलिब्रेटी पितात शाकाहारी दूध, नेमकं असतं तरी काय, कसं तयार होतं?-world plant milk day celebrities drink vegan milk what exactly is it how is it prepared ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Plant Milk Day: मोठमोठे सेलिब्रेटी पितात शाकाहारी दूध, नेमकं असतं तरी काय, कसं तयार होतं?

World Plant Milk Day: मोठमोठे सेलिब्रेटी पितात शाकाहारी दूध, नेमकं असतं तरी काय, कसं तयार होतं?

Aug 22, 2024 08:14 AM IST

What is plant milk: अलीकडे अनेक लोक शाकाहारीच्याही पुढे जाऊन व्हीगन बनले आहेत. हे लोक दुधालासुद्धा मांसाहारी गटात सामील करतात.

World Plant Milk Day 2024
World Plant Milk Day 2024

How is vegan milk made: दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळेच ज्येष्ठांपासून डॉक्टरांपर्यंत सर्वजण दूध पिण्याचा सल्ला देतात. शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी कॅल्शियमयुक्त दूध अत्यंत महत्त्वाचे आहे.परंतु दूध शाकाहारी की मांसाहारी असा वाद नेहमीच पाहायला मिळतो. अलीकडे अनेक लोक शाकाहारीच्याही पुढे जाऊन व्हीगन बनले आहेत. हे लोक दुधालासुद्धा मांसाहारी गटात सामील करतात. हे लोक शाकाहारी दूध म्हणून इतर वनस्पतींपासून मिळणाऱ्या दुधाचे सेवन करतात. याच कारणाने दरवर्षी २२ ऑगस्ट रोजी 'वर्ल्ड मिल्क प्लांट डे' साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात २०१७ मध्ये रॉबी लॉकी यांनी केली होती. जे प्लांट बेस्ड न्यूजचे सह-संस्थापक होते.

प्लांट मिल्क कसे बनते?

वनस्पतींच्या दुधाचेसुद्धा अनेक फायदे आहेत. याची लोकांना आठवण करून देण्यासाठी दरवर्षी हा जागतिक उत्सव साजरा केला जातो. वनस्पतींचे दूध सोयाबीन, ओट्स, बदाम आणि नारळ यासह विविध वनस्पतींपासून बनवले जाते. या प्रकारचे दूध प्रथिने, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. ते डेअरी दुधापेक्षा कॅलरी आणि फॅटमध्ये देखील कमी असतात. त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. सध्याच्या काळात अनेक सेलिब्रेटीदेखील याच प्रकारच्या दुधाचा आपल्या आहारात समावेश करताना दिसून येतात.

प्लांट मिल्कबाबत रंजक गोष्टी-

-ली यू-यिंग नावाच्या चीनी जीवशास्त्रज्ञ आणि अभियंत्याने १९१० मध्ये पॅरिसजवळ पहिला सोया डेअरी संस्था स्थापन केली होती.

-बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार, बदामाच्या दुधाचा उल्लेख ८ व्या आणि १२ व्या शतकात मध्ययुगीन वैद्यकीय ग्रंथांमध्ये करण्यात आला होता.

-याहू फायनान्सच्या मते, वनस्पतीच्या दुधाची जागतिक बाजारपेठ २०३० पर्यंत ३० डॉलर अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

-२०१२ मध्ये फक्त तीन महिन्यांत 344 दशलक्ष डॉलर विक्रीसह बदाम दूध हे युनायटेड स्टेट्समध्ये सर्वाधिक विकले जाणारे वनस्पती-आधारित दूध असल्याचे स्टेटिस्टा म्हणतात.

-विटासोय इंटरनॅशनलच्या मते, जगभरातील अनेक राष्ट्रीय आहार मार्गदर्शक तज्ज्ञ वनस्पती-आधारित दुधाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.

-वनस्पतींचे दूध ग्रहासाठी अनुकूल मानले जाते. 'द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड' २०२० नुसार, जगभरातील आहार-संबंधित हरितगृह वायू उत्सर्जनाच्या तीन चतुर्थांशपेक्षा जास्त प्राणी-आधारित खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे होतात.

प्लांट मिल्कचे वैशिष्ट्य-

वनस्पती आधारित दूध हे प्रथिने, कॅल्शियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे.

यामध्ये डेअरी दुधापेक्षा कमी कॅलरी आणि फॅट असते.वनस्पतीच्या दुधाचे अनेक प्रकार लैक्टोज-मुक्त आणि शाकाहारी असतात. किगाली फार्म्स आणि अँटिसन्स मार्केटच्या मते, अनेक वनस्पती-आधारित दुधात फायबर असते जे गायीच्या दुधात आढळत नाही.