World's first photo: आपण नेहमीच ऐकतो की, एक फोटो लाखो शब्दांच्याबरोबर असते. हे सत्यसुद्धा आहे. कारण फक्त फोटोच्या माध्यमातून एकही शब्द न उच्चारता बरंच काही सांगता येतं. पण फोटोला हा दर्जा इतक्या सहजासहजी मिळालेला नाही. जगातील पहिले छायाचित्र १८२६ मध्ये काढण्यात आले होते. अर्थातच आजपासून तब्बल १९८ वर्षांपूर्वी. आजकाल फोटोंची प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये फोटोग्राफी केली जाते. त्याला विविध संकल्पना दिल्या जातात. परंतु आधी असे नव्हते. आता एका क्लिकवर हवे तसे फोटो मिळतात. पण तेव्हा एका फोटोसाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागत होते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील पहिला फोटो खिडकीतून काढण्यात आला होता. जो फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ निसेफोर यांनी घेतला होता.मात्र, हा फोटो प्रत्यक्षात उतरवण्याचे श्रेय जोसेफ निसेफोर आणि लुई डोगर या शास्त्रज्ञांना जाते. त्यांनीच डग्युरिओटाइप प्रक्रियेचा शोध लावला. जी छायाचित्रणाची पहिली प्रक्रिया आहे. हा शोध फ्रेंच सरकारने १९ ऑगस्ट १८३९ रोजी जाहीर केला. या स्मरणार्थ दरवर्षी यादिवशी 'जागतिक छायाचित्रण दिन' साजरा केला जातो.
१०२१ मध्ये, शास्त्रज्ञ अल-हैथम यांनी कॅमेरा ऑब्स्क्युराचा शोध लावला. जो फोटोग्राफिक कॅमेराचा सर्वात जुना प्रकार आहे. १८२७ मध्ये, शास्त्रज्ञ जोसेफ यांनी प्रथमच फोटोग्राफिक प्लेट आणि कॅमेरा ऑब्स्क्युरा वापरून छायाचित्र काढले. जे खिडकीतून घेतले होते. ते पूर्णपणे स्पष्ट नव्हते. यानंतर, १८३८ मध्ये, लुई डॅग्युरे यांनी डॅग्युरेओटाइप प्रक्रियेचा वापर करून एक छायाचित्र काढले, जे पूर्णपणे स्पष्ट होते. हे यश फ्रेंच सरकारने १८३९ मध्ये सामान्य जनतेसमोर आणले. त्याचबरोबर जगातील पहिला सेल्फी ऑक्टोबर १८३९ मध्ये घेण्यात आला होता. युनायटेड स्टेट्स लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये ते आजही मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे. पुढे १९१३ मध्ये कॅमेऱ्यांचा आकार कमी झाला. यादरम्यान ३५ मिमी स्टिल कॅमेरे विकसित करण्यात आले होते.
माहितीनुसार, ९० चे दशक फोटोग्राफीच्या बाबतीत मोठा बदल घडवून आणणारे ठरले. या काळात रील कॅमेरे लोकप्रियतेच्या शिखरावर होते. बऱ्याच वेळा, या कॅमेऱ्यांसह फोटो काढणे स्पष्ट होईल याची हमी दिली जात नव्हती, परंतु दशकाच्या शेवटी, वाढत्या लोकप्रिय डिजिटल कॅमेऱ्यांनी संपूर्ण चित्र बदलले.
यामध्ये रिल्सऐवजी मेमरी कार्डचा वापर करण्यात आला. कॅमेऱ्यात कैद झालेली ही चित्रे पाहता आली आणि यामध्ये सर्जनशीलतेलाही वाव होता. हळुहळु मोबाईल कॅमेरे देखील बदलाच्या टप्प्यातून गेले आणि मोबाईल फोटोग्राफीचा ट्रेंड सुरु झाला. अशाप्रकारे फोटोग्राफीमध्ये बदल घडत आले आहेत.