World Pharmacy Day 2024: फार्मसीमध्ये कसे कराल करिअर? किती आहे स्कोप? कुठे मिळेल नोकरी?-world pharmacist day 2024 how to make a career in pharmacy how much is the scope where to get a job ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Pharmacy Day 2024: फार्मसीमध्ये कसे कराल करिअर? किती आहे स्कोप? कुठे मिळेल नोकरी?

World Pharmacy Day 2024: फार्मसीमध्ये कसे कराल करिअर? किती आहे स्कोप? कुठे मिळेल नोकरी?

Sep 25, 2024 10:29 AM IST

Scope in Pharmacy: फार्मासिस्टचे क्षेत्र खूप विस्तृत आहे. यामध्ये करिअरच्याही अफाट संधी आहेत. ज्यांना औषधांची माहिती आणि त्यासंबंधित संशोधनाची आवड आहे ते या क्षेत्रात येऊ शकतात.

world pharmacist day 2024
world pharmacist day 2024 (freepik)

Career in Pharmacy:  जगभरात जेव्हा कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. तेव्हा सर्वजण घाबरून गेले होते. परंतु त्याचवेळी जगभरातील औषध कंपन्यांनी लस (कोरोना लस) बनवण्यास सुरुवात केली होती. फार्मास्युटिकल्स क्षेत्राची व्याप्ती बरीच मोठी आहे. नवीन औषधांचा शोध आणि विकासाशी संबंधित काम येथे सतत होत राहतात. औषधांच्या वितरणापासून ते विपणन, पॅकेजिंग आणि व्यवस्थापनापर्यंतची सर्व कामे ही फार्मास्युटिकलचा एक भाग आहे. जागतिक स्तरावर भारताचाही यात मोठा सहभाग आहे. त्यामुळेच आज 'जागतिक फार्मसिस्ट डे'च्या निमित्ताने आपण फार्मसीशी संबंधित अभ्यासक्रम, कार्य प्रोफाइल आणि त्यासाठी आवश्यक पात्रता जाणून घेणार आहोत.

फार्मासिस्टचे क्षेत्र खूप विस्तृत आहे. यामध्ये करिअरच्याही अफाट संधी आहेत. ज्यांना औषधांची माहिती आणि त्यासंबंधित संशोधनाची आवड आहे ते या क्षेत्रात येऊ शकतात. या क्षेत्रात येण्यासाठी डी फार्मसी आणि बी फार्मसीसारखे कोर्स करणे आवश्यक आहे. हा कोर्स केल्यानंतर, विद्यार्थी सरकारी आणि खाजगी व्यतिरिक्त अनेक नवीन करिअर क्षेत्रामध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यामध्ये पगार तर चांगला मिळतोच पण नवीन संशोधनही करायला मिळतं.

सरकारी विभागात करिअर-

एक फार्मासिस्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकार, आरोग्य आणि कल्याण विभागातील नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतो. सरकारी विभागांमधील सार्वजनिक औषध उत्पादन कंपन्यांमध्येही वेळोवेळी नियुक्त्या केल्या जातात. या क्षेत्रातील कोणीही त्यासाठी अर्ज करू शकतो. सरकारी रुग्णालये किंवा संस्थांमध्ये गुणवत्ता नियंत्रण आणि चाचणीसाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली जाते. ज्यामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. लष्करी दल आणि सरकारी बँकांमध्येही फार्मासिस्टच्या नियुक्तीसाठी जागा रिक्त असतात. तर तुम्ही त्याठिकाणीही करिअर करू शकता.

खाजगी संस्थेत करिअर कसे करावे?

तुम्ही फार्मासिस्टची कारकीर्द फार्मास्युटिकल कंपनीमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी, औषध आणि फॉर्म्युला प्रशिक्षक म्हणून देखील सुरू करू शकता. यासाठी बी. फार्मसी किंवा डी. फार्मसीची पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. एमआर म्हणून, तुमचे कार्य औषधाच्या ब्रँडबद्दल चर्चा करणे आणि विक्रीसाठी त्याचा प्रचार करणे आहे. तर औषध प्रशिक्षकाचे काम औषधामध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल सूत्राचे परीक्षण करणे आहे.

सरकारी हॉस्पिटल आणि रिटेलमध्ये नोकरीच्या संधी कोणत्या?

जर तुम्हाला फार्मासिस्टचे ज्ञान अधिक चांगले असेल तर, सरकारी रुग्णालयांमध्ये अफाट संधी आहेत. येथे तुम्ही औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणे साठवणे, गोळा करणे आणि वितरण करणे यासाठी जबाबदार असता. तर रिटेल क्षेत्रात फार्मासिस्टकडे व्यवसाय व्यवस्थापकाप्रमाणे काम करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

खाजगी रुग्णालयात करिअर-

खासगी हॉस्पिटलमध्ये औषधांची साठवणूक आणि वितरणाची जबाबदारी फार्मासिस्टकडे असते. शिवाय औषधांशी संबंधित विभागांची तपासणीही केली जाते. खासगी क्षेत्रातही फार्मासिस्टचा पगार वर्षाला लाखो रुपये आहे. रिटेल क्षेत्रात फार्मासिस्टना औषधांचे व्यवस्थापन करावे लागते.

शिक्षण क्षेत्रात नोकरी-

एम फार्मसी केलेले उमेदवारही शिक्षण क्षेत्रात जाऊ शकतात. आगामी काळात शिक्षक क्षेत्रातही पात्र सहभागींची मागणी वाढू शकते. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर तुम्ही लेक्चररच्या क्षेत्रात जाऊ शकता. पीएचडी केल्यानंतर प्रोफेसरपदासाठीही अर्ज करता येतो. यामध्ये सुरुवातीचा पगारही अधिक चांगला असतो.

संशोधनात करिअर-

फार्मासिस्टना संशोधन क्षेत्रातही खूप वाव आहे. या क्षेत्रात, बहुतेक पीएचडी किंवा संबंधित विषयात फेलोशिप करणारे लोक निवडले जातात. यामध्ये नवनवीन औषधांचा शोध आणि त्यांच्या विकासावर दररोज लक्ष ठेवावे लागते. शिवाय ही औषधे बनवण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी संस्थांशी संपर्क साधावा लागतो.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner