World Pancreatic Cancer Day 2023: स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे काय? जाणून घ्या याचे लक्षणं आणि कशी काळजी घ्यावी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Pancreatic Cancer Day 2023: स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे काय? जाणून घ्या याचे लक्षणं आणि कशी काळजी घ्यावी

World Pancreatic Cancer Day 2023: स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे काय? जाणून घ्या याचे लक्षणं आणि कशी काळजी घ्यावी

Published Nov 16, 2023 10:12 AM IST

Pancreatic Cancer Symptoms: WHO च्या मते स्वादुपिंडाचा कर्करोग जगभरातील कर्करोगांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. स्वादुपिंड शरीराच्या कार्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावते म्हणून स्वादुपिंडाचे आरोग्य राखणे खूप महत्वाचे आहे.

पॅनक्रियाटिक कॅन्सरचे लक्षणे आणि कशी काळजी घ्यावी
पॅनक्रियाटिक कॅन्सरचे लक्षणे आणि कशी काळजी घ्यावी (pexels)

Tips To Keep Pancreas Healthy: तुमची पचनसंस्था नीट काम करत नाही का? तुम्हालाही दररोज अपचन आणि गॅस सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो का? जर होय, तर ते तुमच्या स्वादुपिंडातील अनेक प्रकारच्या समस्यांमुळे असू शकते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी नोव्हेंबर हा महिना पॅनक्रियाटिक कॅन्सर अवेअरनेस मंथ आणि या महिन्यातील तिसरा गुरुवार हा जागतिक पॅनक्रियाटिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी १६ नोव्हेंबर रोजी वर्ल्ड पॅनक्रियाटिक कॅन्सर डे (world pancratic cancer day) साजरा केला जात आहे. या दिनिमित्त शरीरातील पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडाचे कार्य आणि ते निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स येथे जाणून घ्या.

स्वादुपिंड आणि काय आहे त्याचे कार्य?

पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंड हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे आणि पचनसंस्थेचाही एक भाग आहे हे अनेकांना माहीत नाही. ते पोटाच्या मागे स्थित आहे आणि तळहाताच्या आकाराचे असते. ही एक प्रकारची ग्रंथी आहे जी अनेक एंजाइम आणि हार्मोन्स तयार करते. त्याचे कार्य अन्न पचण्यास मदत करणे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन तयार करणे हे आहे.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे (symptoms of pancreatic cancer)

- पोटदुखी जी तुमच्या पाठीपर्यंत पसरते

- भूक न लागणे किंवा वजन कमी होणे

- तुमची त्वचा पिवळसर होणे

- डोळे पांढरे होणे

- फिकट रंगाचे मल

- गडद रंगाचे मूत्र

- त्वचेवर खाज येणे

- रक्ताच्या गुठळ्या

- थकवा

काय आहेत स्वादुपिंडाच्या कर्करोगाची कारणे? (causes of pancreatic caner)

- धूम्रपान

- मधुमेह

- स्वादुपिंडाला सूज

- स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास

- लठ्ठपणा

स्वादुपिंड निरोगी कसे ठेवू शकता?

तुमचे स्वादुपिंद किंवा पॅनक्रियास निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या या काही टिप्स फॉलो करू शकता.

- निरोगी वजन ठेवा आणि नियमित व्यायाम करा. कारण वजन कमी केल्याने तुम्हाला टाइप २ मधुमेह आणि पित्ताशयातील स्टोन टाळता येतात. ज्यामुळे इतर गुंतागुंत होण्याची शक्यता असते.

- कमी चरबीयुक्त आहार घेणे. जास्त चरबीचे सेवन केल्याने पित्ताशयाचे स्टोन होऊ शकतात. ज्यामुळे स्वादुपिंडाला सूज येऊ शकतो. वजन जास्त असणे देखील स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी धोकादायक घटक आहे.

- अल्कोहोलचे सेवन कमी करा. कारण अल्कोहोल प्यायल्याने स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तसेच धूम्रपान सोडा. कारण यामुळे कर्करोगाचा धोका देखील होऊ शकतो.

 

- तुमची नियमित तपासणी करत रहा. नियमित चाचण्यांमुळे तुम्ही योग्य वेळी स्वादुपिंडाचा कर्करोग शोधू शकता.

- स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली जगणे अत्यंत आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner