मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Ovarian Cancer Day: गॅस आणि ब्लोटिंगही असू शकतात गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष

World Ovarian Cancer Day: गॅस आणि ब्लोटिंगही असू शकतात गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 08, 2024 10:14 AM IST

World Ovarian Cancer Day 2024: आंबट ढेकर येणे, पोट फुगणे आणि अन्न पचण्यास असमर्थता ही अशी लक्षणे आहेत ज्याकडे लोक अपचन म्हणून दुर्लक्ष करतात. पण जर तुम्हाला हे सतत जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोला. ही गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

World Ovarian Cancer Day: गॅस आणि ब्लोटिंगही असू शकतात गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष
World Ovarian Cancer Day: गॅस आणि ब्लोटिंगही असू शकतात गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष (unsplash)

Common Symptoms of Ovarian Cancer: गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात दरवर्षी सुमारे ५०,००० गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होते. यामुळे स्त्री प्रजनन प्रणालीच्या इतर कोणत्याही कर्करोगापेक्षा जास्त मृत्यू होतात. वाढत्या वयानुसार त्याचा धोका वाढतो. तर धूम्रपान करणाऱ्या आणि इतर औषधे वापरणाऱ्या महिलांना जास्त धोका असतो. सुरुवातीच्या टप्प्यात याचे निदान झाल्यास सुमारे ८० ते ९०% स्त्रिया यातून रिकव्हर होतात. गर्भाशयाचा कर्करोग हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो अंडाशयाच्या पेशींमध्ये तयार होतो. कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे अंडाशयाच्या पृष्ठभागावर "एपिथेलियल" पेशींची निर्मिती. अंडी निर्माण करणाऱ्या "जंतू" पेशी किंवा अंडाशयातील सपोर्टिंग टिश्यू (स्ट्रोमा) पासून देखील कर्करोग विकसित होतो. दरवर्षी ८ मे हा जागतिक गर्भाशयाच्या कर्करोग दिन (world ovarian cancer day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित महत्वाची माहिती देणे आणि त्याबद्दल जागरूक करणे हा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गर्भाशयाच्या कर्करोगाच्या या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष (ovarian cancer early symptoms)

- पोटात सूज येणे किंवा सतत फुगल्यासारखे वाटणे.

- ओटीपोट आणि नितंब यांच्या दरम्यानच्या भागात वेदना किंवा कोमलतेची भावना.

- भूक न लागणे किंवा खाल्ल्यानंतर खूप पोट भरल्यासारखे वाटणे.

- वारंवार लघवी येणे

- आंबट ढेकर येणे.

- बद्धकोष्ठता किंवा अतिसार

- पाठीत जास्त वेदना जाणवणे

- सतत थकवा जाणवणे

- अचानक कारण नसताना वजन कमी होणे.

- सेक्स करताना जास्त वेदना होणे

- श्वास घेण्यास त्रास होतो

- पीरियड्स फ्लोमध्ये बदल.

- ताप येणे.

या महिलांनी घ्यावी अधिक काळजी

वाढते वय - वाढत्या वयानुसार गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. साधारणपणे ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची प्रकरणे दिसून येतात.

जनुक बदल - जनुक उत्परिवर्तन हे देखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे एक कारण आहे. पालकांकडून वारशाने मिळालेली जनुकेही काही प्रमाणात यासाठी जबाबदार असू शकतात. BRCA1 आणि BRCA2 जनुकांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. या जनुकांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.

कौटुंबिक इतिहास - तुमच्या कुटुंबातील कोणत्याही महिलेला कधीही गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रासले असेल, तर तुम्हाला सामान्य महिलांपेक्षा जास्त धोका आहे.

वाढते वजन - वाढणारे वजन हे देखील याचे कारण असू शकते. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे निरोगी वजन राखणे फार महत्वाचे आहे.

पोस्टमेनोपॉझल हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी - रजोनिवृत्तीची चिन्हे आणि लक्षणे नियंत्रित करण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतल्याने तुमच्या गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

कधीही गर्भधारणा होत नाही - जर तुम्ही कधीच गरोदर नसाल तर तुम्हाला गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

कमी वयात मासिक पाळी येणे आणि योग्य वयात रजोनिवृत्ती न येणे - लहान वयात मासिक पाळी सुरू होणे आणि मोठ्या वयात रजोनिवृत्ती या दोन्हीमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel