Health Care: लठ्ठपणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, गैरसमज दूर करणे आणि या वैद्यकीय स्थितीबद्दल जागरूकता वाढविणे या उद्देशाने दरवर्षी जागतिक लठ्ठपणा दिवस साजरा केला जातो. चरबीच्या स्वरूपात शरीराचे अतिरिक्त वजन वाढते. यामुळे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. गंभीर संधिवात आणि अगदी काही विशिष्ट कर्करोगही यामुळे होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, २५ किंवा त्यापेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) जास्त वजन आणि ३० किंवा त्यापेक्षा जास्त बीएमआय लठ्ठ मानला जातो.
हे जगभरातील एक सार्वजनिक आरोग्य संकट आहे जिथे जगातील एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक याचा त्रास घेतात आणि सुमारे ५ पैकी १ मुले आणि ३ पैकी १ प्रौढ लोक याचा सामना करतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, इस्केमिक हृदयरोग, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, गॉल स्टोन, अॅसिडिटी, स्ट्रोक, कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस, वंध्यत्व आणि मानसिक आघात अशा असंख्य सहव्याधी लठ्ठपणाशी संबंधित आहेत.
गंभीर बनतो कारण तो खराब मानसिक आरोग्य परिणाम आणि जीवनाची गुणवत्ता कमी होण्याशी संबंधित आहे आणि कोविड -१९ साथीच्या काळातदेखील, लठ्ठ रूग्णांना सामान्य व्यक्तींच्या तुलनेत गंभीर कोरोना व्हायरस आजार आणि खराब परिणाम नोंदविला गेला.
जागतिक लठ्ठपणा दिन हा ४ मार्च रोजी साजरा केला जातो
जागतिक लठ्ठपणा महासंघाने आपल्या जागतिक सदस्यांच्या सहकार्याने हा दिवस आयोजित केला होता आणि २०१५ मध्ये प्रथम एक वार्षिक मोहीम म्हणून साजरा केला.
निरोगी वजन मिळविणे आणि टिकवून ठेवणे, योग्य उपचार घेणे आणि लठ्ठपणाच्या साथीला मागे टाकण्यास लोकांना मदत करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक लठ्ठपणा दिवस साजरा केला जातो. अगदी माफक वजन कमी करणे देखील लठ्ठपणाशी संबंधित आरोग्याच्या समस्येमध्ये सुधारणा किंवा प्रतिबंध करू शकते.
लहान मुलांमध्ये वजन कमी करणे थोडंसं अवघड ठरते कारण त्यांचे शरीर वाढत असतं आणि विकसित होत असते. अशावेळी मुलांना दूरदर्शन पाहण्याऐवजी घरात वेळ घालवण्याऐवजी मोकळ्या जागेत खेळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. नियमित अंतराने निरोगी जेवण आणि स्नॅक्स प्रदान करून त्यांना निरोगी खाण्याच्या पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
संबंधित बातम्या