World No Tobacco Day 2024: काय आहे वर्ल्ड नो टोबॅको डे साजरा करण्याचा उद्देश? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि थीम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World No Tobacco Day 2024: काय आहे वर्ल्ड नो टोबॅको डे साजरा करण्याचा उद्देश? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि थीम

World No Tobacco Day 2024: काय आहे वर्ल्ड नो टोबॅको डे साजरा करण्याचा उद्देश? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि थीम

Published May 31, 2024 11:37 AM IST

World No Tobacco Day 2024 Theme: दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय, या दिवसाचा इतिहास आणि यावर्षीची थीम जाणून घ्या.

जागतिक तंबाखू विरोधी दिन
जागतिक तंबाखू विरोधी दिन (freepik)

World No Tobacco Day History: जगभरात दरवर्षी ३१ मे रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' साजरा केला जातो. मराठीमध्ये हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. आरोग्यासाठी तंबाखूचे धोके माहीत असूनही, जगभरातील मोठ्या संख्येने लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करतात. बिडी, सिगारेट, गुटखा इत्यादींच्या सेवनाने अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तंबाखू सोडण्यासाठी आणि तंबाखूला कधीही हात लावू नये यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी हा तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. तंबाखूचा निषेध किंवा विरोध करणारा दिवस साजरा करण्याची गरज पहिल्यांदा कधी आणि का भासली ते जाणून घेऊया. तसेच जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे यावर्षीची थीम पाहा.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा इतिहास

सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेने १९८७ मध्ये तंबाखू विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामागचे कारण म्हणजे त्या काळात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र, पुढच्या वर्षी म्हणजे १९८८ मध्ये एप्रिल महिन्यात पहिल्यांदा जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर मे महिन्यात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्त्व

तंबाखूजन्य पदार्थांबद्दल जगभरातील तरुण-तरुणींचे आकर्षण वाढत आहे. अशा परिस्थितीत लोकांना तंबाखूचे सेवन करण्यापासून रोखण्यासाठी आणि तंबाखूपासून होणाऱ्या हानीबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी जगभरात साजरा केला जातो.

जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२४ ची थीम

दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी नवीन थीम ठेवली जाते. जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२४ ची थीम 'तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे' (Protecting children from tobacco industry) अशी आहे. म्हणजेच तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे जेणेकरून भावी पिढ्यांचे संरक्षण केले जाऊ शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner