World Music Day 2024: मन दु:खी असो किंवा आनंदाने उड्या मारत असो, एक चांगले संगीत हृदय आणि मनाला शांती देते. संगीताचे हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक संगीत दिन’ साजरा केला जातो. संगीत ही एक उत्तम थेरपी आहे, जी मन एकाग्र करण्यासाठी, नैराश्य आणि तणावासारख्या समस्या दूर करण्याचे आणि मानसिक आरोग्य संतुलित राखण्याचे काम करते.
एका संशोधनात असे समोर आले आहे की, जर तुम्ही तुमच्या आवडीचे संगीत ऐकले तर तुमचा मूड आनंदी राहतो आणि विचार करण्याची शक्तीही वाढते. इतकंच नाही तर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल, तर ती समस्याही हळूहळू सुधारू लागते. चला जाणून घेऊया चांगले संगीत ऐकून एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यास कोणते आश्चर्यकारक फायदे मिळतात. तसेच कोणत्या वेळी कोणत्या प्रकारचे संगीत ऐकावे हे देखील जाणून घेऊया…
> तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी चांगले संगीत हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. चांगले संगीत मन एकाग्र आणि शांत करण्यास मदत करू शकते. नियमित संगीत ऐकल्याने मनाला आराम तर मिळतोच, शिवाय मेंदूचे कार्यही चांगले होते.
> सौम्य आणि मनाला शांत करणारे संगीत आपल्या शरीरालाही आराम देऊ शकते. संगीत आपल्या वेदना आणि दु:खाची भावना देखील कमी करते. एका अभ्यासात असे आढळले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती असह्य वेदनेत संगीत ऐकते, तेव्हा ती आपल्या वेदनांना प्रतिसाद देण्यास विसरून जाते.
> संगीत ऐकल्याने भावनिक संतुलन राखण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिक समस्यांमधून बाहेर पडण्यास मदत होते.
> रोज सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ संगीत ऐकल्याने उच्च रक्तदाबाची पातळी सुधारते. तर रोज संथ लय असणारे संगीत ऐकल्याने स्ट्रोकची समस्याही दूर होते. एका अभ्यासानुसार, संगीतात तीन तंत्र असतात, जे मेंदूला आराम देतात.
> निद्रानाशाचा त्रास होत असेल, तर झोपण्यापूर्वी ३०-४५ मिनिटे संगीत ऐकण्यास सुरुवात करा. रात्री रॉक किंवा रेट्रो संगीत अजिबात ऐकू नका. अन्यथा परिणाम विपरीत होऊ शकतात. झोपण्यापूर्वी चांगलं संगीत स्नायूंना आराम देतं आणि झोपेत अडथळा आणणाऱ्या विचारांना आपल्या मेंदूपासून दूर ठेवतं.
> झोपण्यापूर्वी हलके संगीत किंवा लोकसंगीत ऐकल्याने निद्रानाशाची समस्या तर दूर होतेच, शिवाय तणावही दूर होतो.
> स्वयंपाक करताना शास्त्रीय संगीत ऐकल्याने तणावाबरोबरच नैराश्याची समस्याही दूर होऊ शकते.
> ध्यान किंवा योगा करताना भारतीय अभिजात संगीत, निसर्गाचे नाद, वाद्यसंगीत ऐकणे फायदेशीर ठरते. असे संगीत झोपेची समस्या दूर करून, ध्यानधारणेदरम्यान लक्ष केंद्रित करण्यास देखील उपयुक्त ठरू शकते.
संबंधित बातम्या