Health Benefits of Music: मूड खराब असेल तेव्हा तुमचे आवडते संगीत ऐका, हे तुमचा मूड बूस्ट करण्यास मदत करते, असे तुम्ही नेहमी ऐकले असेल. दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिनासोबतच जागतिक संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक संगीत दिनाची सुरुवात १९८२ मध्ये फ्रान्समध्ये झाली. जगभरातील ३२ हून अधिक देशांमध्ये जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. संगीताची जादू अशी आहे की खराब मूड चांगला होतो. जगात क्वचितच अशी व्यक्ती असेल ज्याला संगीत आवडत नसेल. संगीत ऐकणे हा केवळ छंद किंवा आवडीचा विषय नाही तर संगीत ऐकल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. आवडते संगीत ऐकले तर त्याचा आपल्या आरोग्याला कोणते फायदे मिळतात ते जाणून घ्या.
अभ्यासातून असे दिसून आले आहे की शस्त्रक्रियेपूर्वी संगीत ऐकणे भूल देण्यासारखे कार्य करते आणि मज्जातंतूंना रिलॅक्स करण्यास मदत करते. शस्त्रक्रियेपूर्वी संगीत ऐकले तर ते चिंता दूर करण्यास मदत करते.
संशोधनात असे दिसून आले आहे की संगीत ऐकल्याने हृदयात रक्त प्रवाह सुलभ होतो. तसेच हार्ट रेट देखील कमी होते. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
संगीत ऐकल्याने मूड बूस्ट करण्यास मदत होते. ते मेंदूत डोपामाइन हार्मोनचे उत्पादन वाढवतात. ज्याच्या मदतीने चिंता आणि नैराश्यात आराम मिळतो. संगीत थेट मेंदूच्या अमिग्डालामध्ये प्रक्रिया केली जाते, जे मूड आणि भावनांसाठी जबाबदार असते.
बऱ्याच संशोधनात असे दिसून आले आहे की बायोकेमिकल स्ट्रेस ट्रिगर झाल्यावर संगीत मेंदूला शांत करते आणि ताण तणाव कमी करते. नैराश्यामुळे खूप लो वाटत असेल तर संगीत ऐकून तुम्ही स्वत:मध्ये एनर्जी फील करू शकता.
अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यासारख्या आजारांवर कायमस्वरूपी उपचार नाही. परंतु म्युझिक थेरपीमुळे ही सर्व लक्षणे दूर होतात. स्मरणशक्ती सुधारण्यासोबतच हे रुग्णांमध्ये संवाद सुधारतो.
संगीत वजन कमी करण्यास देखील मदत करते. संगीत ऐकून व्यायाम केल्याने शरीराचे एंड्युरन्स लेव्हल वाढते आणि वेगाने व्यायाम करावासा वाटतो. ज्यामुळे शारीरिक परिवर्तन वेगाने होते.
अभ्यासात असे दिसून आले आहे की कमी प्रकाशात आणि कमी आवाजात संगीत ऐकून जेवण केल्यास अन्न कमी प्रमाणात कंज्यूम होते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या