World Music Day History and Significance: आनंदाचा काळ असो किंवा कठीण काळ, एकटेपण वाटत असो किंवा मित्रांसोबत आनंद घेताना, प्रवास करताना किंवा घरी काम करत असताना, संगीत आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागासाठी बॅकग्राउंड स्कोअर तयार करते. हे आपल्याला सेलिब्रट करण्यास, स्वतःला शांत करण्यास किंवा कधी कधी फक्त आनंदी वाटण्यास आणि जीवनाचे कौतुक करण्यास मदत करते. कोणत्याही कला प्रकाराप्रमाणेच संगीत सुद्धा भाषेच्या बंधनांच्या पलीकडे जाते आणि त्यामुळेच ते अधिक सुंदर बनते. संगीत आपल्याला मन शांत करण्यास मदत करते आणि मूड देखील चांगले करते. संगीताचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि आपल्याला ही सुंदर कला भेट देणाऱ्या गायकांचा आणि संगीतकारांचा सत्कार करण्यासाठी दरवर्षी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. जागतिक संगीत दिन हा जगभरात मोठा उत्सव असतो. हा खास दिवस साजरा करताना जाणून घ्या या दिवसाविषयी काही गोष्टी.
जागतिक संगीत दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. जगभरातील जवळपास १२० देशांमध्ये मैफिली, संगीत सादरीकरण आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून जागतिक संगीत दिन साजरा केला जातो.
१९८२ मध्ये फ्रान्समध्ये सुरू झालेला फेटे दे ला म्युसिक हा संगीत महोत्सव जागतिक संगीत दिन म्हणून अस्तित्वात आला असे मानले जाते. १९८१ मध्ये फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री जॅक लँग यांनी संगीताचा दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली. दुसऱ्या एका सिद्धांतानुसार, १९७६ मध्ये जोएल कोहेन यांनी समर सॉलस्टिसच्या प्रारंभानिमित्त रात्रभर संगीत उत्सवाची कल्पना मांडली आणि तेव्हापासून २१ जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो.
जागतिक संगीत दिनाचे उद्दिष्ट म्हणजे तरुण पिढीसाठी एक कला म्हणून संगीत अधिक उपभोग्य बनवणे हा आहे. ही जागा अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी, लोकांना संगीताच्या विविध शैली, प्रकारांचा शोध घेण्यास उद्युक्त करण्यासाठी आणि नव्या पिढ्यांनी सादर केलेल्या कलेचे स्वागत करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.
संगीतकार आणि गायक सार्वजनिक ठिकाणी आपल्या श्रोत्यांसाठी सादरीकरण करून संगीताला एक कला म्हणून आदर देऊन हा दिवस साजरा करतात. या उत्सवानिमित्त जगभरात मैफिली, सादरीकरण आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
संबंधित बातम्या