World Mosquito Day: जगभरात किती आहेत डासांच्या प्रजाती? त्यापैकी मनुष्यासाठी घातक कोणत्या? जाणून घ्या...-world mosquito day 2024 what are the dangerous mosquito species around the world ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Mosquito Day: जगभरात किती आहेत डासांच्या प्रजाती? त्यापैकी मनुष्यासाठी घातक कोणत्या? जाणून घ्या...

World Mosquito Day: जगभरात किती आहेत डासांच्या प्रजाती? त्यापैकी मनुष्यासाठी घातक कोणत्या? जाणून घ्या...

Aug 20, 2024 08:56 AM IST

The most poisonous mosquito: जागतिक डास दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना डास चावल्याने होणाऱ्या आजारांबाबत जागरूक करणे हा आहे.

जगभरात किती आहेत डासांच्या प्रजाती
जगभरात किती आहेत डासांच्या प्रजाती

Total species of mosquitoes in the world: आज २० ऑगस्ट रोजी देशभरात जागतिक डास दिवस साजरा केला जात आहे. १८९७ मध्ये या दिवशी लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे ब्रिटीश डॉ. रोनाल्ड रॉस यांनी मादी ॲनोफिलीस डासाचा शोध लावला. या डासाच्या चावण्यामुळे मलेरियासारखे गंभीर आजार पसरतात. मलेरिया हा एक आजार आहे ज्यावर वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू होऊ शकतो. जागतिक डास दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना डास चावल्याने होणाऱ्या आजारांबाबत जागरूक करणे हा आहे. तसेच बचावाबद्दल काय करता येईल याचीसुद्धा जागरूकता करता येईल.

  • डासांपासून होणारे रोग-

-मलेरिया

-येलो फिव्हर

-झिका व्हायरस

-चिकुनगुनिया

-डेंग्यू ताप

-वेस्ट नाईल व्हायरस

-सेंट लुईस एन्सेफलायटीस

-जपानी एन्सेफलायटीस

-ला क्रॉस एन्सेफलायटीस

-ईस्टर्न आणि वेस्टर्न एन्सेफलायटीस

 

  • डासांच्या विविध प्रजाती-

-एडिस

-क्युलेक्स

-कुलिसेटा

-मॅनसोनिया

-सोरोफोरा

-वायोमिया

-ॲनोफिलीस

-टॉक्सोरहिनाइट्स

  • 'जागतिक डास दिना'चे महत्त्व:

आज २० ऑगस्ट २०२४ रोजी जागतिक डास दिवस साजरा केला जात आहे . हा दिवस डासांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेषतः मलेरिया, डेंग्यू आणि झिका यांसारख्या घातक रोगांचे वाहक म्हणून. हा दिवस सर रोनाल्ड रॉसच्या शोधाचा सन्मान करतो. की मादी डास मानवांमध्ये मलेरिया प्रसारित करतात, जे या रोगांशी लढण्यासाठी धोरणे विकसित करण्यात मूलभूत ठरले आहे.

  • मनुष्यसाठी सर्वात घातक डास कोणते?

-एडिस इजिप्ती- या डासामुळे झिका, चिकुनगुनिया आणि डेंग्यू सारखे घातक रोग पसरतात.

-एडिस अल्बोपिक्टस: पिवळा ताप आणि डेंग्यूचे विषाणूही या डासामुळे पसरतात.

-क्युलेक्स मॉस्किटो: हा डास सामान्यतः घरांमध्ये आढळतो.

-ॲनोफिलीस गॅम्बिया: याला आफ्रिकन मलेरिया डास असेही म्हणतात.

हे सर्व डास मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.

  • डासांच्या एकूण प्रजाती किती-

सामन्यतः डासांच्या तब्बल २५०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. परंतु तज्ज्ञांच्या मते, डासांच्या सुमारे ३५०० प्रजाती आहेत. त्यापैकी चावणाऱ्या प्रजाती केवळ काहीशा आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, डासांचे सरासरी जीवन चक्र ३ महिने असते. तर नर डास फक्त १० दिवस जगतात. विशेष म्हणजे मादी डास मरण्यापूर्वी ५०० अंडी घालू शकतात.

  • जगातील सर्वात मोठा डास-

रिपोर्ट्सनुसार, चीनच्या सिचुआन प्रांतात जगातील सर्वात मोठा डास सापडला आहे. हा डास दिसायला इतका मोठा आहे की, त्याचे पंख ११ सेंटीमीटरपर्यंत आहेत. चायनीज मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा डास "इन्सेक्ट म्युझियम ऑफ वेस्ट चायना" मध्ये ठेवण्यात आला आहे. हा डास इतका घातक आहे की, त्याच्या चावण्याने फक्त २० मिनिटांत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग