World Mental Health Day: ‘या’ सवयी मेंदूला करतात खराब; वेळेतच सुधारा अन्यथा होईल मोठे नुकसान!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Mental Health Day: ‘या’ सवयी मेंदूला करतात खराब; वेळेतच सुधारा अन्यथा होईल मोठे नुकसान!

World Mental Health Day: ‘या’ सवयी मेंदूला करतात खराब; वेळेतच सुधारा अन्यथा होईल मोठे नुकसान!

Oct 10, 2024 03:53 PM IST

World Mental Health Day:जर या सवयी तुमच्या दिनचर्येत सामील असतील, तर वाढत्या वयाबरोबर तुमच्या मेंदूला मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून ‘या’ सवयी वेळीच सुधारा.

World Mental Health Day
World Mental Health Day

World Mental Health Day: वाढत्या वयाबरोबर शरीरासोबत मेंदूही काम करणे बंद करतो. त्यामुळे अनेकांना अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. या आजारांचा सामना करणे खूप कठीण आहे. म्हातारपणी अनेकदा होणाऱ्या या आजारांना तारुण्यात झालेल्या चुका कारणीभूत असतात. जर अशा ८ सवयी तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये सामील असतील, तर समजून जा की म्हातारपण सुरू होताच तुमचा मेंदू देखील कमकुवत होऊ लागू शकतो. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जाणून घेऊया, अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुमच्या मेंदूला हानी पोहोचवू शकतात.

अंधारात राहण्याची सवय

जर, तुम्ही बराच वेळ अंधारात घालवत असाल किंवा तुम्हाला लाईट बंद करून राहायला आवडत असेल, तर ही सवय मेंदूला नुकसान पोहोचवू शकते. तज्ज्ञांच्या मते, जास्त काळ अंधारात राहिल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होतो. त्यामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

सतत नकारात्मक गोष्टी ऐकणे

सतत नकारात्मक बातम्या ऐकल्यानेही मेंदूचे नुकसान होते. नकारात्मक बातम्या ऐकल्याने मनात नकारात्मक विचार येतात, ज्यामुळे नैराश्य, चिंता, तणाव यासारख्या समस्या वाढतात. ज्याचा वाढत्या वयाबरोबर मेंदूवर वाईट परिणाम होतो.

समाजापासून, लोकांपासून दूर राहणे

जर, तुम्ही लोकांमध्ये मिसळत नसाल आणि बंद खोलीत एकांतात राहणे पसंत करत असाल, तर ही सवय तुमच्या मेंदूला हानी पोहोचवू शकते. सततच्या एकाकीपणामुळे मेंदू तसेच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे ती व्यक्ती हृदयरोग आणि नैराश्यासारख्या आजारांना बळी पडते. हळूहळू ही सवय अल्झायमरसारख्या समस्यांना जन्म देऊ लागते.

हेड फोनवर मोठ्या आवाजात ऐकणे

जर, तुम्हालाही हेडफोनवर जोरात गाणी किंवा आवाज ऐकण्याची सवय असेल, तर ही सवय तुमच्या मेंदूला हानी पोहोचवते. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ हेडफोन वापरल्याने मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये समस्या निर्माण होऊ लागतात.

Mental Health Day: मानसिक आरोग्यासाठी दररोज करा 'ओम मेडिटेशन', कसं आणि कधी करायचं जाणून घ्या

झोपेचा अभाव

जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल आणि तुमच्या झोपेत सतत व्यत्यय येत असेल, तर ते तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे मेंदूला नुकसान होण्याचा धोका वाढतो.

जास्त साखर खाणे

जास्त साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि याचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, अति साखरेचे सेवन डिमेंशिया आणि अल्झायमरसाठी कारणीभूत ठरू शकते.

जास्त स्क्रीन टाईम

एका अभ्यासानुसार, प्रौढ व्यक्ती स्क्रीनवर किती वेळ घालवतो, याचा त्याच्या शिकण्याच्या क्षमतेवर, स्मरणशक्तीवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

व्यायाम न करणे 

शारीरिक काम न केल्याने आणि दिवसभर एकाच जागी बसून राहिल्याने न्यूरॉन्स कमकुवत होऊ लागतात आणि व्यक्तीला पार्किन्सन्ससारख्या आजाराचा त्रास होऊ शकतो. कारण, जेव्हा एखादी व्यक्ती सक्रिय राहते, तेव्हा न्यूरॉन्स वेगाने तयार होतात आणि ते एंडोर्फिन हार्मोन्स तयार करतात. शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यामुळे मेंदू निष्क्रिय होऊ लागतो.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner