World Menopause Day: मेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर काय परिणाम होतो? लक्षणे हाताळण्यासाठी फॉलो करा या टिप्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Menopause Day: मेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर काय परिणाम होतो? लक्षणे हाताळण्यासाठी फॉलो करा या टिप्स

World Menopause Day: मेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर काय परिणाम होतो? लक्षणे हाताळण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Oct 17, 2023 11:19 PM IST

World Menopause Day 2023: जेव्हा स्त्रीच्या शरीरातील अंडाशय आणि अंड्यांची संख्या कमी होऊ लागते तेव्हा रजोनिवृत्ती येते. याव्यतिरिक्त इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स देखील शरीरात कमी तयार होतात. जाणून घ्या रजोनिवृत्तीचा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो.

मेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर होणारा परिणाम
मेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर होणारा परिणाम

How Menopause Affects Women's Physical Health: रजोनिवृत्ती म्हणजे 'मासिक पाळीचा शेवट'. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना मासिक पाळी येणे बंद होते. फार कमी स्त्रियांना माहीत आहे की रजोनिवृत्तीचे ३ टप्पे असतात - प्री-मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट-मेनोपॉज. महिलांना ३७ ते ३८ या वयात प्री-मेनोपॉजची लक्षणे जाणवू शकतात. परंतु त्याचे वय प्रत्येक स्त्रीसाठी भिन्न असू शकते.

रजोनिवृत्ती कधी येते?

मेनोपॉज तेव्हा येते जेव्हा स्त्रीच्या शरीरातील अंडाशय आणि अंड्यांची संख्या कमी होऊ लागते. याव्यतिरिक्त शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचे उत्पादन देखील कमी होते. अशा परिस्थितीत स्त्रियांना मानसिक आरोग्याच्या समस्या जसे की तणाव, चिंता, नैराश्य, मूड स्विंग्स आणि चिंता यांचा सामना करावा लागतो. पण याचा अर्थ असा नाही की रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना शारीरिक त्रास होत नाही. यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागते.

रजोनिवृत्तीचा महिलांच्या शरीरावर होणारा परिणाम

हॉट फ्लॅश

हॉट फ्लॅश हे रजोनिवृत्तीच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. यामध्ये महिलांच्या शरीरातील तापमान अचानक वाढू लागते. त्यामुळे महिलांना त्वचेवर पुरळ उठून शरीरात गरमी जाणवू शकते

रात्रीचा घाम येणे

स्त्रियांना रजोनिवृत्ती दरम्यान घाम येणे यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात. विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त घाम येतो. त्यामुळे महिलांच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो.

वजन वाढणे

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांचे वजनही झपाट्याने वाढू लागते. वास्तविक या स्थितीत महिलांची चयापचय क्रिया मंदावते. याव्यतिरिक्त त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात. अशा परिस्थितीत महिलांना वजन वाढण्याची समस्या भेडसावते. विशेषतः पोटाच्या आजूबाजूच्या भागात चरबी जमा होऊ लागते.

ऑस्टियोपोरोसिस

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते. तसेच रजोनिवृत्ती मोठ्या वयात येते. त्यामुळे त्यांची हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत स्त्रियांना ऑस्टियोपोरोसिसची लक्षणे दिसू शकतात.

रजोनिवृत्तीमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांचे व्यवस्थापन कसे करावे?

- रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना तणावाचा सामना करावा लागतो. या अवस्थेत ते नैराश्य आणि चिंतेचे बळी होऊ लागतात. अशा परिस्थितीत कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी घेणे फायदेशीर ठरू शकते. हे तणाव आणि नैराश्याचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते.

- योनिमार्गात कोरडेपणा किंवा रात्री घाम येणे यासारख्या समस्या असल्यास, तुम्ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेऊ शकता.

- रजोनिवृत्तीची लक्षणे कमी करण्यासाठी प्राणायाम आणि योगासने करणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे मन आणि मेंदू शांत राहतो.

- रोज व्यायाम केल्याने देखील रजोनिवृत्तीची लक्षणे कमी होण्यास मदत होते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

- रजोनिवृत्तीनंतर सकस आहार घ्या. त्यात सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे समाविष्ट करा.

 

- तुम्हीही रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर पोहोचला असाल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुम्हाला काही अडचण जाणवत असेल तर तुम्ही एकदा तज्ञांना नक्की भेटा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner