World Meditation Day: कितीवेळ मेडिटेशन केल्याने होतो फायदा? जाणून घ्या मेडिटेशनबाबत महत्वाच्या गोष्टी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Meditation Day: कितीवेळ मेडिटेशन केल्याने होतो फायदा? जाणून घ्या मेडिटेशनबाबत महत्वाच्या गोष्टी

World Meditation Day: कितीवेळ मेडिटेशन केल्याने होतो फायदा? जाणून घ्या मेडिटेशनबाबत महत्वाच्या गोष्टी

Dec 21, 2024 10:01 AM IST

Benefits of Meditation In Marathi: काही लोक मेडिटेशन करतात पण त्यांना त्याचा फायदा होत नाही. अशा परिस्थितीत शरीरासाठी किती वेळ ध्यान म्हणजेच मेडिटेशन करणे फायदेशीर आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

What Happens When You Meditate In Marathi
What Happens When You Meditate In Marathi

How Long To Meditate In Marathi: योग आणि मेडिटेशन हे भारतीय जीवनशैलीचा एक भाग मानले गेले आहे. पण आजकाल नियमितपणे मेडिटेशन आणि योगासने करणारे फार कमी लोक आहेत. काही लोक मेडिटेशन करतात पण त्यांना त्याचा फायदा होत नाही. अशा परिस्थितीत शरीरासाठी किती वेळ ध्यान म्हणजेच मेडिटेशन करणे फायदेशीर आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. आणि त्याबाबत असणाऱ्या इतर विशेष गोष्टी देखील जाणून घेणे महत्वाचे आहे....

तुम्हाला किती काळ मेडिटेशन केल्याने फायदे मिळतात?

ज्याप्रमाणे औषधे ठराविक वेळी आणि अंतराने घेतल्याने फायदा होतो. त्याचप्रमाणे मेडिटेशनसाठीही एक निश्चित वेळ आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेबसाइटनुसार, दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान 20 मिनिटे मेडिटेशन केले तर त्याचे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात.

त्याचा फायदा कसा होतो?

मेडिटेशन केल्याने मानसिक शांती आणि ऊर्जा मिळते आणि मनात सकारात्मकता जाणवते. वास्तविक, दिवसभर कामात व्यस्त राहिल्याने शरीरासह मनही थकून जाते आणि ऊर्जाही संपते. अशा स्थितीत मनाला ऊर्जा देण्यासाठी ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे.

मेडिटेशनसाठी आसन काय असावे?

मेडिटेशनसाठी नेहमी सर्वात आरामदायक जागा निवडा. तसेच, बसण्याची मुद्रा देखील पूर्णपणे आरामदायक असावी. जमिनीवर योगा चटई ठेवून ध्यान करणे आवश्यक नाही. खुर्ची किंवा सोफ्यावर बसूनही ध्यान करता येते. फक्त लक्षात ठेवा की ध्यान करताना, पूर्णपणे स्थिर रहा आणि शरीर सतत हलवू नका.

मेडिटेशनचे फायदे-

> जर ध्यान नियमित केले तर त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.

> चिंतेतून आराम मिळतो.

> झोप न येण्याची समस्या दूर होते.

> विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

> एकाग्रता वाढते.

> मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात.

> डोकेदुखी आणि नैराश्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Whats_app_banner