मराठी बातम्या  /  Lifestyle  /  World Meditation Day 2023 Know Different Types Of Meditation

World Meditation Day 2023: मेडिटेशनने मिळतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या ध्यानाचे प्रकार

मेडिटेशनचे प्रकार
मेडिटेशनचे प्रकार
Hiral Shriram Gawande • HT Marathi
May 21, 2023 07:34 PM IST

Meditation Benefits: ध्यान केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. काही अभ्यासानुसार, ध्यान केल्याने अनेक रोगांच्या लक्षणांपासून आराम मिळू शकतो. येथे जाणून घ्या ध्यान कसे करावे

Different Types of Meditation: जागतिक ध्यान दिवस दरवर्षी २१ मे रोजी साजरा केला जातो. जागरुकता वाढवण्यासाठी आणि दैनंदिन ध्यानाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. व्यस्त जीवनशैली आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला शांतता हवी असते. अशा स्थितीत ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. योगासोबतच ध्यानाचे अनेक फायदे आहेत. दररोज ध्यान केल्याने रक्तदाब सामान्य राहतो, चिंता कमी होते, तणाव कमी होतो. व्यस्त जीवनातून विश्रांती घेण्याचा उत्तम पर्याय म्हणजे शांत ठिकाणी बसून ध्यान करणे. ध्यान दरम्यान, योग्यरित्या लक्ष केंद्रित करणे आणि आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. तुम्ही अनेक प्रकारे ध्यान करू शकता. येथे जाणून घ्या ध्यान करण्याचे प्रकार.

ट्रेंडिंग न्यूज

१. फोकस मेडिटेशन

ध्यानाच्या या पद्धतीमुळे फोकस आणि अटेंशन वाढवता येते. यामध्ये तुमच्या पाच इंद्रियांवर लक्ष केंद्रित करा. याशिवाय श्वासावर लक्ष केंद्रित करा. हे करण्यासाठी तुम्ही जप करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचे श्वास मोजू शकता.

२. व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन

हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे, जो पूर्ण झाल्यावर आनंदी राहण्यास मदत करतो. हे मूड बूस्ट करते तसेच तणाव पातळी कमी करण्यास मदत करते.

३. मंत्रा मेडिटेशन

धार्मिक लोकांमध्ये मंत्र ध्यान हा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे. यामध्ये एखाद्या मंत्राचा किंवा शब्दाचा वारंवार जप करताना ध्यान करावे लागते. ध्यानाची ही पद्धत लावल्यावर सर्व इंद्रिये काम करू लागतात.

४. माइंडफुलनेस मेडिटेशन

या ध्यान पद्धतीमध्ये तुम्हाला तुमच्या मनातील विचारांकडे लक्ष द्यावे लागते. हे ध्यान तुमचे मन सध्याच्या क्षणावर केंद्रित ठेवण्यास मदत करते, विश्रांती आणि मानसिक स्पष्टता वाढवते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel