Tips for Happy Married Life: वैवाहिक नाते टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी कमिटमेंट, आदर, संवाद आणि एकत्र वाढण्याची तयारी या गोष्टी खूप आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात स्थैर्य, भावनिक आधार आणि सहवास आणणारी एक महत्त्वाची संस्था म्हणजे विवाह आहे. त्यातून कुटुंब घडवण्याची संधीही मिळते. वैवाहिक संबंधांचे महत्त्व आणि कायदेशीररित्या विवाहित जोडपे असण्याचे सौंदर्य अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जागतिक विवाह दिन (world marriage day) साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस ११ फेब्रुवारी रोजी साजरा केला जात आहे. वर्ल्डवाइड मॅरेज एन्काऊंटरने याची स्थापना केली होती आणि वैवाहिक जीवनातील विश्वासूपणा, त्याग आणि आनंद यांच्या सौंदर्याचा सन्मान करते.
जागतिक विवाह दिनाचा इतिहास १९८१ पासून सुरू होतो, जेव्हा लुईझियानामधील बॅटन रूज येथे महापौर, गव्हर्नर आणि बिशप यांना सेंट व्हॅलेंटाइन डे 'आम्ही मॅरेज डेवर विश्वास ठेवतो' म्हणून घोषित करण्याची विनंती केली. ही कल्पना प्रचंड यशस्वी झाली आणि त्यानंतरच्या वर्षी ४३ राज्यपालांनी या दिवसाला औपचारिक मान्यता दिली आणि १९८३ पासून दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या रविवारी जागतिक विवाह दिन म्हणून साजरा करण्याचे स्वीकारले गेले. १९९३ मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांनी जागतिक विवाह दिनानिमित्त अपोस्टोलिक आशीर्वाद दिले आणि आता या विशेष दिवसाचा उत्सव जगभरात साजका केला जातो.
आधुनिक काळात संवादाचा अभाव, आर्थिक ताण आणि कपल्सचे वेगवेगळे प्राधान्यक्रम यामुळे विवाह मोडत असल्याचे पाहायला मिळते. वाढती व्यक्तिवाद आणि बदलत्या लिंगभूमिका यामुळे वैवाहिक जीवनाच्या यशात आव्हाने निर्माण होत आहेत. या जटील प्रश्नांकडे योग्य संवाद, सहानुभूती आणि परस्पर प्रयत्नांनी लक्ष देण्याची गरज आहे.
संवाद साधा: एकमेकांसोबत वेळ घालवणे आणि नियमितपणे संवाद साधणे ही आनंदी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. कारण यामुळे समजूतदारपणा आणि संबंध सुधारतात.
परस्पर आदर : एकमेकांच्या मतांचा आणि दृष्टिकोनाचा आदर करणे आणि प्रयत्नांचे कौतुक केल्यास वैवाहिक जीवन यशस्वी होण्यास मदत होते.
क्वालिटी टाईम स्पेंड कराः एकमेकांना प्राधान्य देऊन आणि वैवाहिक बंध मजबूत करणारे अॅक्टिव्हिटी केल्याने गैरसमज दूर होण्यास मदत होतात. एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायला विसरून का.
सहानुभूती: आपल्या जोडीदाराच्या गरजा आणि भावना ऐकून सहानुभूती बाळगा. त्यांचा दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)