Foods for Malaria Fever: जागतिक मलेरिया दिन २५ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा एकमेव उद्देश डासांमुळे होणाऱ्या या प्राणघातक आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. मादी ॲनोफिलीसचावल्याने मलेरिया पसरतो. डासांच्या चाव्याव्दारे, परजीवी रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि लाल रक्त पेशींना संक्रमित करतात. त्यामुळे शरीरात खूप ताप आणि थरथरी होते. याशिवाय मलेरियाच्या बाबतीत इतर लक्षणेही दिसतात. वास्तविक मलेरियाच्या बाबतीत कोणताही विशेष आहार पाळण्याचा सल्ला दिला जात नाही. पण ताप आल्यास या गोष्टी खाल्ल्याने आणि काही गोष्टी टाळल्यास उपचारासोबत लवकर बरे होण्यास मदत होते.
- खूप ताप
- थंडी वाजून येणे
- अस्वस्थता जाणवणे
- डोकेदुखी
- उलट्या
- जुलाब
- पोटदुखी
- स्नायू आणि सांधेदुखी
- थकवा
- जलद श्वासोच्छ्वास
- हृदयाचे ठोके वाढणे
- खोकला
काही लोकांना मलेरिया झाल्यानंतर मलेरिया सायकलचा अनुभव येतो. ज्यामध्ये थंडी वाजून थरीथरी होऊन ताप येतो आणि नंतर घामाने तापमान सामान्य होते. मलेरिया तापाची लक्षणे डास चावल्यानंतर काही आठवड्यांनी सुरू होतात.
मलेरिया ताप आल्यावर शरीराला जास्त कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची गरज भासते. शरीराचे तापमान वाढल्यावर शरीराला कॅलरीजची जास्त गरज भासते. अशा परिस्थितीत जास्त कार्बोहायड्रेटयुक्त आहार घ्या आणि पचायला सोप्या असलेल्या या गोष्टी खा. तसेच व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले पदार्थ खा. तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा.
- भात
- बीटरूट
- गाजर
- पपई
- द्राक्षे
- बेरी
- लिंबू
- संत्री
ही फळे खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर डिटॉक्स होते. त्यामुळे उपचारादरम्यान शरीर सहज बरे होऊ शकते
मलेरियाच्या बाबतीत शरीराला फायटोन्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. जेणेकरून ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करता येईल. नट्समध्ये फायटोन्यूट्रिएंट्सचे प्रमाण चांगले असते. त्यात हेल्दी फॅट आणि प्रथिने देखील असतात. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुम्हाला ताप असताना काही खावेसे वाटते तेव्हा तुम्ही नट्स खाऊ शकता.
ताप असताना खाण्याची इच्छा कमी होते. अशा परिस्थितीत लिक्विड इनटेकचे प्रमाण वाढवा. ग्लुकोज पाणी, ताज्या फळांचा रस, नारळ पाणी, लिंबू सरबत, इलेक्ट्रॉल वॉटर घ्या. तसेच पाणी पिताना पाणी उकळलेले किंवा निर्जंतुकीकरण केले आहे याची खात्री करा. यासोबतच तांदळाचे पाणी, डाळीचे पाणी, सूप इत्यादी द्रव पदार्थांचा आहारात समावेश करा.
शरीरातील ऊती कमी झाल्यामुळे अधिक प्रथिनांची आवश्यकता असते. ज्यामध्ये आहारातील हाय कार्बोहायड्रेटसह हाय प्रोटीन रिकव्हरसाठी मदत करतात. दही, लस्सी आणि ताक पिणे फायदेशीर ठरू शकते.
- गहू
- मिलेट्स
- सीड्स
- खूप जास्त फायबर असलेले पदार्थ जसे हिरव्या पालेभाज्या
- पातळ साल असलेली फळे
- संपूर्ण धान्य
- जास्त चरबीयुक्त पदार्थ
- मसालेदार पदार्थ
- हेवी फूड
- कॉफी
- चहा
- कॅफिनयुक्त पेय
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या