मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Malaria Day 2024: मलेरियाच्या या वॉर्निंग साइन अजिबात करू नका दुर्लक्ष, सर्वांना माहीत असणे आवश्यक

World Malaria Day 2024: मलेरियाच्या या वॉर्निंग साइन अजिबात करू नका दुर्लक्ष, सर्वांना माहीत असणे आवश्यक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 25, 2024 09:28 AM IST

World Malaria Day 2024: मलेरियाचा वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. मलेरियाची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी या वॉर्निंग साइनकडे दुर्लक्ष करू नका.

World Malaria Day 2024: मलेरियाच्या या वॉर्निंग साइन अजिबात करू नका दुर्लक्ष, सर्वांना माहीत असणे आवश्यक
World Malaria Day 2024: मलेरियाच्या या वॉर्निंग साइन अजिबात करू नका दुर्लक्ष, सर्वांना माहीत असणे आवश्यक (unsplash)

Warning Signs of Malaria: प्लाझमोडियम परजीवी हे मलेरियाचे कारण आहे आणि संक्रमित अॅनोफिलीस डासांच्या चाव्यामुळे पसरते. मलेरियाची चिन्हे आणि लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात. त्यामुळे अजिबात विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. 'एचटी लाइफस्टाइल'ला दिलेल्या मुलाखतीत परळ मुंबईतील ग्लेनिगल्स हॉस्पिटल्सच्या सीनियर कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी मलेरियाची १० लक्षणे सांगितली, ज्याकडे आपण दुर्लक्ष करू नये.

ट्रेंडिंग न्यूज

१. तीव्र ताप आणि घाम येणे: तसं तर तीव्र ताप इतर कोणत्याही आजाराचे किंवा स्थितीचे लक्षण असू शकते. परंतु सामान्यत: मलेरिया असलेल्यांमध्ये देखील हे दिसून येते. जर तुम्हाला हाय फिव्हर असेल तर त्वरीत डॉक्टरांना भेटा जे मलेरियाच्या निदानाची पुष्टी करण्यासाठी आपल्याला काही चाचण्यांची शिफारस करतील.

२. थंडी: थंडी वाजते का? मग तो मलेरिया असू शकतो. आपल्या लक्षणांकडे लक्ष देणे चांगले आहे.

३. स्नायू दुखणे आणि डोकेदुखी: मलेरिया असणाऱ्यांमध्ये ही एक सामान्य घटना आहे.

४. थकवा : तुम्हाला सतत थकवा जाणवतो का? तुमची रोजची कामे सहजतेने करू शकत नाही? मग डॉक्टरांचा सल्ला घेण्याची हीच योग्य वेळ आहे. अत्यंत थकवा म्हणजे मलेरिया.

५. मळमळ, जुलाब, उलट्या : ही लक्षणे आरोग्याच्या अनेक समस्यांबरोबरच मलेरियात देखील असतात. मळमळ होणे, उलट्या होणे आणि जुलाब किंवा अतिसार हे लक्षणे असतील तर डॉक्टरांना भेटा.

६. खोकला: अलीकडे खोकला येतो का? खोकल्यामुळे आपली रोजची कामे सहजतेने पार पाडणे अवघड जात आहे का? तो मलेरिया असू शकतो.

७. जलद श्वासोच्छ्वास: हे सुद्धा मलेरियाचे एक लक्षण आहे.

८. ओटीपोटात दुखणे: पोटात दुखत असेल तर तो मलेरिया असू शकतो. आपल्या आरोग्याशी तडजोड न करता रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी अचूक निदान आणि उपचार मिळवा.

९. ब्लडी यूरिन: मूत्रमार्गाच्या संसर्गाव्यतिरिक्त (यूटीआय) हे देखील मलेरियाचे लक्षण असू शकते.

१०. पाठदुखी: पाठदुखीमुळे तुमची मनःशांती हिरावून घेतली जात आहे का? सावध राहा हा मलेरिया असू शकतो.

साक्रा वर्ल्ड हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन आणि डायबेटोलॉजीचे एचओडी डॉ. सुब्रत दास यांनी सांगितले की, मलेरियासारखे वेक्टरजनित आजार भारतात प्रचलित आहेत, जे जगभरातील संसर्गजन्य रोगांच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे १७% आहेत. परिणामी या आजारांशी संबंधित खालील वॉर्निंग साइन ओळखणे आवश्यक आहे

- सर्वात सामान्य लक्षण म्हणजे ताप आणि थंडी, जे वारंवार चक्रीय पॅटर्नचे अनुसरण करतात.

- वारंवार होणाऱ्या लक्षणांमध्ये डोळ्यांच्या मागे दुखणे, प्रकाशासाठी इनटॉलरन्स, आणि सतत डोकेदुखी यांचा समावेश होतो.

- भूक कमी होऊ शकते. ज्यामुळे थकवा, अत्यधिक थकवा किंवा चैतन्य किंवा चेतना कमी होते.

- काही लोकांना पुरळ येऊ शकतात.

- कावीळसारख्या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त मळमळ आणि उलट्या यासारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणांसह गंभीर प्रकरणे उद्भवू शकतात.

- लाल रक्तपेशींचे ऱ्हास हे मलेरियासारख्या वेक्टरजनित आजारांमध्ये अॅनिमियाचे कारण आहे.

- न्यूरोलॉजिकल आजाराच्या लक्षणांमध्ये गोंधळ, प्रलाप किंवा आक्षेप यांचा समावेश असू शकतो.

- श्वसनाच्या समस्या जसे श्वास लागणे आणि खोकला येणे कायम राहू शकतात. कारण आपल्या फुफ्फुसांशी तडजोड केली जाते.

- अशक्तपणामुळे स्नायू, सांधे आणि सामान्य स्नायू दुखतात.

- मान आणि कंबरेच्या भागात सूजलेल्या लिम्फ नोड्स.

वेळीच हाताळले नाही तर मलेरिया प्राणघातक ठरू शकतो. मलेरियाची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहे. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel