World Lung Day 2024: शरीरात होणारे हे बदल असू शकतात फुफ्फुसे खराब होण्याची लक्षणे, वेळीच ओळखा-world lung day 2024 these changes in the body can be signs of lung damage recognize it in time ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Lung Day 2024: शरीरात होणारे हे बदल असू शकतात फुफ्फुसे खराब होण्याची लक्षणे, वेळीच ओळखा

World Lung Day 2024: शरीरात होणारे हे बदल असू शकतात फुफ्फुसे खराब होण्याची लक्षणे, वेळीच ओळखा

Sep 25, 2024 09:47 AM IST

Tips to keep lungs healthy: ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही.आपली फुफ्फुसे शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यात आणि अशुद्ध हवा बाहेर काढण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून, इतर अवयवांप्रमाणे, फुफ्फुस हा सर्वात महत्वाचा अवयव मानला जातो.

World Lung Day 2024
World Lung Day 2024 (freepik)

Symptoms of lung damage:  आपण सतत श्वास घेतो आणि बाहेर सोडतो. हे करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आपल्या शरीरात पोहोचत. तर जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. शुद्ध हवा शरीरात पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही.आपली फुफ्फुसे शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यात आणि अशुद्ध हवा बाहेर काढण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून, इतर अवयवांप्रमाणे, फुफ्फुस हा सर्वात महत्वाचा अवयव मानला जातो. जर आपली फुफ्फुसे नीट काम करत नसेल तर त्यामुळे शरीरात अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

परंतु आजकाल आपण पाहतो की लोकांमध्ये श्वसन आणि फुफ्फुसाशी संबंधित समस्या सतत वाढत आहेत. यामध्ये फुफ्फुसाचा संसर्ग, दमा, पल्मोनरी फायब्रोसिस, एस्बेस्टोसिस यासारख्या गंभीर परिस्थितींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत व्यक्तीला श्वास घेण्यास खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत तुमच्या फुफ्फुसाच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. लोकांना फुफ्फुसाचे महत्त्व समजावे आणि संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी जागरूक व्हावे यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी 'जागतिक फुफ्फुस दिन' साजरा केला जातो.

फुफ्फुसाशी संबंधित आजारांमध्ये दिसतात ही लक्षणे -

जेव्हा आपल्या फुफ्फुसांमध्ये काही समस्या उद्भवतात आणि ते योग्यरित्या कार्य करत नाहीत, तेव्हा आपल्या शरीरात अनेक लक्षणे दिसतात. चांगली गोष्ट म्हणजे ही लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांकडून योग्य उपचार घेतल्यास कोणतीही गंभीर हानी टाळता येते.

'ही' लक्षणे सामान्यतः फुफ्फुसांशी संबंधित समस्यांच्या बाबतीत दिसतात-

-वारंवार छातीत इन्फेक्शन

-छातीत दुखणे किंवा ताण येणे

-दम लागणे, विशेषत: व्यायामादरम्यान

-छातीत घरघर, किंवा सतत कफ होणे

थकवा, ताप आणि अशक्तपणा जाणवणे

-अचानक वजन कमी होणे

-सतत खोकला किंवा थुंकीतून रक्त येणे

फुफ्फुस निरोगी कसे ठेवावे?

आम्ही तुम्हाला सांगतो की फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ हवेत श्वास घेणे. प्रदूषणात कमी वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि मास्क घालून बाहेर जा. याशिवाय योगा आणि प्राणायामचा नियमित सराव केल्याने फुफ्फुसे मजबूत होतात. सोबतच सकस आणि संतुलित आहार घ्या, फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी अन्नाचीही भूमिका महत्वाची असते. नियमित व्यायाम केल्याने फुफ्फुसेही निरोगी राहण्यास मदत होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner