World Lung Cancer Day 2024: काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या 'वर्ल्ड लंग कॅन्सर डे' चा इतिहास व महत्त्व
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Lung Cancer Day 2024: काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या 'वर्ल्ड लंग कॅन्सर डे' चा इतिहास व महत्त्व

World Lung Cancer Day 2024: काय आहे यंदाची थीम? जाणून घ्या 'वर्ल्ड लंग कॅन्सर डे' चा इतिहास व महत्त्व

Jul 31, 2024 11:43 PM IST

World Lung Cancer Day 2024 Theme: दरवर्षी १ ऑगस्ट रोजी वर्ल्ड लंग कॅन्सर डे साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्वासोबतच यावर्षी थीम जाणून घ्या.

वर्ल्ड लंग कॅन्सर डे
वर्ल्ड लंग कॅन्सर डे (Shutterstock)

World Lung Cancer Day History and Significance: फुफ्फुसांचा कर्करोग हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये छातीत दुखणे, खोकलासोबत रक्त येणे, घरघराणे, श्वास लागणे आणि वजन कमी होणे यांचा समावेश आहे.

फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण म्हणजे तंबाखूचे सेवन. तर दुसरे जवळच कारण म्हणजे प्रदूषणाचा संपर्क हे आहे. भारतात जीवनशैलीच्या हानिकारक सवयी आणि प्रदूषित हवेच्या संपर्कामुळे फुफ्फुसांचा कर्करोग खूप सामान्य आहे. दरवर्षी जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस १ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि त्याचा सामना करण्यासाठी उपाय शोधले जातात. हा महत्वाचा दिवस साजरा करताना त्याचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम जणून घ्या.

वर्ल्ड लंग कॅन्सर डेचा इतिहास

२०१२ मध्ये फोरम ऑफ इंटरनॅशनल रेस्पिरेटरी सोसायटीज (FIRS) आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ लंग कॅन्सर (IASLC) यांनी निर्णय घेतला की दरवर्षी १ ऑगस्ट हा जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जाईल. जेणेकरून या आजाराबद्दल आणि सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला लाइफस्टाईल सवयी बदलायला हव्यात त्याबद्दल जागरूकता वाढेल. तेव्हापासून दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो.

वर्ल्ड लंग कॅन्सर डे २०२४ ची थीम

यंदाच्या जागतिक फुफ्फुस कर्करोग दिनाची थीम आहे - केअर गॅप कमी करा: प्रत्येकाला कर्करोगाची काळजी मिळणे आवश्यक आहे. (Close the care gap: Everyone deserves access to cancer care.)

वर्ल्ड लंग कॅन्सर डेचे महत्त्व

फुफ्फुसांच्या कर्करोगाचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते - नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि स्मॉल-सेल लंग कॅन्सर (SCLC). दरवर्षी जागतिक फुफ्फुसांच्या कर्करोग दिनानिमित्त, फुफ्फुसांच्या कर्करोगाचा संभाव्य धोका, प्रतिबंधात्मक टिप्स, जीवनशैली बदल आणि उपचार पर्यायांवर चर्चा केली जाते. लोकांना फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका आणि लवकर निदानाचे महत्त्व पटवून दिले जाते. हा दिवस लोकांना एकत्र येण्याची आणि कर्करोगाचा उपचार सर्वांसाठी सुलभ आणि परवडण्याजोगा बनविण्याचे मार्ग शोधण्याची संधी म्हणून कार्य करतो.

Whats_app_banner