World Lung Cancer Day 2024: फुफ्फुसात फार लवकर दिसू लागतात कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं, वेळीच ओळखणे महत्त्वाचे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Lung Cancer Day 2024: फुफ्फुसात फार लवकर दिसू लागतात कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं, वेळीच ओळखणे महत्त्वाचे

World Lung Cancer Day 2024: फुफ्फुसात फार लवकर दिसू लागतात कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं, वेळीच ओळखणे महत्त्वाचे

Published Aug 01, 2024 01:59 PM IST

Lung Cancer Symptoms: वर्ल्ड लंग कॅन्सर डे निमित्त या धोकादायक आजाराची लक्षणे कोणती आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण सुरुवातीची लक्षणे आढळल्यास उपचार परिणामकारक ठरतात.

फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं
फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं

Early Signs and Symptoms of Lung Cancer: जगभरात १ ऑगस्ट रोजी वर्ल्ड लंग कॅन्सर डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांमध्ये या धोकादायक आजाराविषयी जनजागृती करणे हा आहे. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी केवळ धूम्रपानच नव्हे तर इतर कारणेही जबाबदार असतात. यात पर्यावरण आणि अनुवांशिकतेचा समावेश आहे. मात्र फुफ्फुसात दिसणारी सुरुवातीची लक्षणे ओळखली तर या आजारामुळे होणारा मृत्यू टाळता येतो. शरीरात अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करून घ्यावी.

फुफ्फुसाच्या कर्करोगात दिसतात ही सुरुवातीची लक्षणं

जरी ही लक्षणे फुफ्फुसांच्या कर्करोगाची नसली तरी जेव्हा ही लक्षणे दिसून येतात तेव्हा डॉक्टरांना भेटून तपासणी करणे आवश्यक असते. कारण फुफ्फुसाचा कॅन्सर सुद्धा खूप सायलंट असतो आणि त्याचा काही विशेष परिणाम होत नाही. सुरुवातीच्या अवस्थेत त्याची ओळख पटली तर परिणामकारक उपचारांच्या साहाय्याने ती दुरुस्त करता येते.

- सतत खोकला येत असेल आणि तो कधीच दूर होत नसेल, उलट खोकल्याची स्थिती काळाच्या ओघात बिघडत चालली आहे.

- खोकल्याबरोबर रक्त, किंवा खोकल्यानंतर गढूळ रक्ताच्या रंगाची थुंकी किंवा श्लेष्मा बाहेर पडणे.

- फास्ट किंवा खोल श्वास घेतल्यास छातीत दुखणे. खोकला, हसताना देखील ही वेदना होऊ शकते.

- वजन सतत कमी होत असेल, ज्याचे काही खास कारण नसते.

- श्वास घेण्यास त्रास होतो.

- सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

- फुफ्फुसांचा संसर्ग वारंवार होतो. ब्राँकायटिस, न्यूमोनिया सारखे हे आजार एकदा झाले की बरे होत नाहीत आणि पुन्हा पुन्हा येतात.

- श्वासोच्छवासाबरोबर छातीत घरघरण्याचा आवाज येऊ लागला आहे.

- आवाज दिवसेंदिवस जड आणि कर्कश होत चालला आहे.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार, फुफ्फुसांचा कर्करोग शरीराच्या दुसऱ्या भागात पसरत असल्यास ही लक्षणे दिसून येतात.

- हाडांमध्ये वेदना, विशेषत: पाठ आणि हिप दुखणे.

- फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे मज्जासंस्थेत बदल होतात. ज्यामुळे अशक्तपणा, डोकेदुखी, हातपाय सुन्न झाल्याची भावना निर्माण होते. फीट सुरू होतात किंवा शरीराचा समतोल राखण्यात अडचण येते.

- त्वचा आणि डोळे पिवळे दिसतात. याचे कारण म्हणजे कर्करोगाच्या पेशी यकृतापर्यंत पोहोचल्या आहेत.

- लिम्फ नोडची सूज, ज्यामुळे बऱ्याचदा गळ्याजवळील कॉलरबोन आणि मानेला सूज येते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner