World Leprosy Day : कुष्ठरोग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या रोगाची लक्षण आणि त्यावरील उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Leprosy Day : कुष्ठरोग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या रोगाची लक्षण आणि त्यावरील उपाय

World Leprosy Day : कुष्ठरोग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या रोगाची लक्षण आणि त्यावरील उपाय

Jan 27, 2025 12:04 PM IST

World Leprosy Day 2025 Importance : कुष्ठरोगाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी आणि समाजातील त्याबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'जागतिक कुष्ठरोग दिन' साजरा केला जातो.

कुष्ठरोग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या रोगाची लक्षण आणि त्यावरील उपाय
कुष्ठरोग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या रोगाची लक्षण आणि त्यावरील उपाय

World Leprosy Day 2025 : लोकांमध्ये कुष्ठरोगाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी आणि समाजातील त्याबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'जागतिक कुष्ठरोग दिन' साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओ म्हणते की, हा दिवस कुष्ठरोगाशी संबंधित लोकांचे अयोग्य विचार दूर करण्यासाठी आणि रोगाने प्रभावित झालेल्या लोकांना उपचारासाठी प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांचा समाजातील सन्मान वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, जगभरातील कुष्ठरोगाची सर्वाधिक प्रकरणे आफ्रिका आणि आशियामध्ये आहेत. यूएसएमध्ये दरवर्षी १०० पैकी १ लोकांना याचे निदान केले जात आहे. भारतातही कुष्ठरोग ही मोठी समस्या आहे.

काय आहे कुष्ठरोग?

कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे, ज्यामुळे शरीरावर गंभीर जखमा होतात. विशेषत: हात, पाय किंवा त्वचेवर अशा जखमा येतात आणि काही लोकांमध्ये यामुळे मज्जातंतूंचे देखील नुकसान देखील होते. कुष्ठरोग हा शतकानुशतके चालत आलेला आजार आहे, परंतु तो फारसा संसर्गजन्य नाही. उपचार न केलेल्या कुष्ठरोगाने पीडित व्यक्तीच्या नाकातून आणि तोंडातून येणाऱ्या द्रावाच्या वारंवार संपर्कामुळे संसर्ग पसरण्याचा धोका असतो. प्रौढांपेक्षा लहान मुलांना कुष्ठरोग होण्याची जास्त शक्यता असते.

Do You Know: खाण्याचा एकमेव पदार्थ जो कधीच खराब होत नाही, हजारो वर्षांपर्यंत राहतो ताजातवाना

कुष्ठरोगाची लक्षणे आणि कारणे

कुष्ठरोगाचा प्रामुख्याने त्वचेवर परिणाम होतो. काही लोकांमध्ये, यामुळे मेंदू आणि मणक्याच्या हाडाच्या बाहेरील नसांशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. मुख्य लक्षणांमध्ये त्वचेचे आजार, रक्ताच्या गुठळ्या किंवा रक्तप्रवाहात अडथळे यांचा समावेश असू शकतो. जखमांमध्ये पिवळसरपणा जास्त दिसतो. हा रोग जसजसा वाढत जातो तसतसे भुवया/पापण्या हलवता न येणे, वेदना, अंगाचा लालसरपणा आणि जळजळ होण्याची समस्या देखील वाढते. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री (M. leprae) नावाच्या हळूहळू वाढणाऱ्या जीवाणूमुळे होतो.

कुष्ठरोगावरील उपचार

कुष्ठरोगावर उपचार करणे शक्य आहे आणि ते त्याच्या प्रकारावर अवलंबून असते. संसर्ग बरा करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो, उपचाराचा प्रभाव सहसा ६ महिने ते एक वर्ष टिकतो. मात्र, जर रुग्णाला मज्जातंतूंच्या नुकसानीची समस्या असेल, तर यासाठी इतर उपचारांचा वापर केला जातो. गेल्या दोन दशकांत या आजाराने ग्रस्त १६ दशलक्ष (१.६ कोटी) लोक बरे झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटना कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्या सर्व लोकांना मोफत उपचार प्रदान करते.

(डिस्क्लेमर या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner