IVF Day: पहिल्याच प्रयत्नात आयव्हीएफ यशस्वी करायचं आहे? महिला आणि पुरुषांनी लक्षात ठेवाव्या या महत्त्वाच्या गोष्टी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  IVF Day: पहिल्याच प्रयत्नात आयव्हीएफ यशस्वी करायचं आहे? महिला आणि पुरुषांनी लक्षात ठेवाव्या या महत्त्वाच्या गोष्टी

IVF Day: पहिल्याच प्रयत्नात आयव्हीएफ यशस्वी करायचं आहे? महिला आणि पुरुषांनी लक्षात ठेवाव्या या महत्त्वाच्या गोष्टी

Jul 23, 2024 10:30 PM IST

World IVF Day 2024: आयव्हीएफ प्रक्रिया १०० टक्के यशस्वी होईल, हे तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. या प्रक्रियेतून जर कोणाला पालक व्हायचे असेल तर महिला आणि पुरुष दोघांनी या महत्त्वाच्या टिप्स फॉलो कराव्यात.

वर्ल्ड आयव्हीएफ डे
वर्ल्ड आयव्हीएफ डे (unsplash)

Tips to Make IVF Successful: लग्नानंतर प्रत्येक कपल कुटुंब वाढवण्याचा विचार करत असतात. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक छोटा पाहुणा हवा असतो. मात्र आजकाल बहुतांश कपल मूल न होण्याच्या समस्येशी झगडत आहेत. बराच काळ कपल प्रयत्न करूनही जेव्हा नैसर्गिकरित्या प्रेग्नेंट होत नाहीत, तेव्हा ते आयव्हीएफचा आधार घेतात. ही प्रक्रिया जगभर प्रसिद्ध होत आहे. कपलला पालक बनण्याचा हा एक मार्ग आहे. मात्र, ते पूर्णपणे यशस्वी होईलच असे नाही. जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नांतच आयव्हीएफ यशस्वी करायचं असेल तर महिला आणि पुरुष दोघांनी या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करावे.

 

महिलांनी फॉलो कराव्या या टिप्स

हेल्दी डायट

आपल्या शरीराला कमीत कमी तीन महिने हेल्दी आहाराने डिटॉक्सिफाय करणे महत्वाचे आहे. हे अंडी आणि शुक्राणूंची गुणवत्ता वाढवून आयव्हीएफ यशस्वी करू शकते.

निरोगी वजन टिकवून ठेवा

कमी वजन किंवा जास्त वजनामुळे प्रेग्नेंट होणे कठीण होऊ शकते. जास्त वजन असणे एखाद्या तज्ञाच्या उपचारादरम्यान हार्मोन लेव्हलचे परीक्षण करण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम करू शकते. तथापि, कमी वजनामुळे देखील समस्या उद्भवू शकतात.

दररोज व्यायाम करा

आठवड्यातून ४-५ दिवस दररोज किमान ३० ते ४० मिनिटे शारीरिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला जाते. टेबल टेनिस, बॅडमिंटन, पोहणे, नृत्य किंवा योगा यासारखे व्यायाम शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.

व्हिटॅमिन घ्या

व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई घेतल्यास भ्रूण प्रत्यारोपणास मदत होते. आणि यशस्वी आयव्हीएफ चक्रासाठी फॉलिक अॅसिड देखील आवश्यक आहे.

योग्य फर्टिलिटी क्लिनिक निवडा

अनुभवी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफसह क्लिनिक शोधणे चांगले आहे ज्यांना यशाचा इतिहास आहे आणि आयव्हीएफमध्ये तज्ञ आहेत.

पुरुषांनी फॉलो कराव्या या टिप्स

या क्रिया टाळा

शुक्राणूंची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी पुरुषांनी अशा क्रिया टाळल्या पाहिजे ज्या अंडकोष उबदार करतात. जसे की सायकल चालविणे आणि गरम पाण्याने आंघोळ करणे. उष्णतेच्या संपर्कामुळे शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो आणि त्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते.

शुक्राणूंचे आरोग्य सुधारणे

योग्य बॉक्सर घातल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. याशिवाय काही औषधे अशी आहेत जी शुक्राणूंचे प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही वाढवू शकतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घ्या.

जीवनसत्त्वे आणि सप्लीमेंट घ्या

व्हिटॅमिन ए, बी ६, बी १२, सी, ई, झिंक, सेलेनियम आणि मॅगनीज सारख्या आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे घेतल्यास शुक्राणूंची गुणवत्ता वाढू शकते.

तणाव कमी करा

तणावामुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण खराब होऊ शकते. योग आणि ध्यान यासारख्या तणाव कमी करणाऱ्या अॅक्टिव्हिटीचा सराव करा.

डॉक्टरांना भेटा

आयव्हीएफ प्रक्रियेनंतर आपल्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करणे महत्वाचे आहे. ते आपल्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देऊ शकतात.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner