World Hindi Day 2025: भारत हा विविध भाषांनी समृद्ध देश आहे. त्यातीलच एक भारताची समृद्ध भाषा असणारी हिंदी होय. हिंदी ही देशाची अधिकृत भाषा समजली जाते. परंतु याबाबतही अनेक वादविवाद आणि मतभेद अलीकडच्या काळात पाहायला मिळतात. इतर भाषांप्रमाणेच हिंदी ही भाषा भारताच्या सांस्कृतिक आणि भाषिक एकतेचे प्रतीक आहे. ज्या देशात शेकडो भाषा आणि लिपी अस्तित्वात आहेत, तिथे सुमारे ४४% भारतीयांची मातृभाषा हिंदी आहे. हिंदी ही केवळ एक भाषा नाही तर ती भारतीय अस्मितेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. हिंदी भाषेचे क्षेत्र इतके विस्तृत आहे की ते केवळ भारतातच नाही तर परदेशातही पसरलेले आहे. ते परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचार करते.
देशात आणि परदेशात सर्वांना हिंदीचे महत्त्व कळावे आणि हिंदी भाषेचा प्रचार व्हावा यासाठी दरवर्षी जागतिक स्तरावर हिंदी दिन साजरा केला जातो. परंतु, हिंदी दिन वर्षातून दोनदा साजरा केला जातो, त्यापैकी एक जागतिक हिंदी दिन आणि दुसरा राष्ट्रीय हिंदी दिन आहे. जगात हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून स्थापित करण्याच्या उद्देशाने साजरा केला जाणारा जागतिक हिंदी दिनाचा इतिहास काय आहे, तो का आणि केव्हा साजरा केला जातो जाणून घेऊया. सोबतच आज आपण हिंदीतील ५ सर्वात कठीण शब्द कोणते ते पाहणार आहोत.
दरवर्षी १० जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हिंदी भाषेचा जागतिक प्रचार आणि महत्त्व वाढवणे आहे.
१० जानेवारी १९७५ रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे पहिल्यांदाच जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. या ऐतिहासिक परिषदेचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे हा होता. या परिषदेत सुमारे ३० देशांतील १२२ प्रतिनिधी उपस्थित होते. युरोपीय देश नॉर्वेमधील भारतीय दूतावासात पहिला जागतिक हिंदी दिन साजरा करण्यात आला.
> किंकर्तव्यविमूढ़ - काय करू काय नको अशी स्थिती
> अट्टालिका- वरची खोली किंवा उंच इमारतीचा भाग
> श्लाघ्य- प्रशंसनीय
> निर्निमेष- डोळे न मिचकावता पाहणे-
> क्लिष्ट- कठीण
>यत्किंचित- थोडाफार
> सुमुत्सुक- उत्साही
संबंधित बातम्या