मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Hindi Day 2024: का साजरा केला जातो जागतिक हिंदी दिवस? जाणून घ्या इतिहास

World Hindi Day 2024: का साजरा केला जातो जागतिक हिंदी दिवस? जाणून घ्या इतिहास

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 10, 2024 10:55 AM IST

World Hindi Diwas 2024: दरवर्षी १० जानेवारी रोजी जगभरात जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला, या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या.

जागतिक हिंदी दिवस
जागतिक हिंदी दिवस (unsplash)

History and Significance of World Hindi Day: हिंदी ही भारताच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे. फक्त भारतातच नाही तर ही भाषा जगभरात बोलली जाते. मँडरिन आणि इंग्रजीनंतर हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असल्याचे पाहायला मिळते. भारतीय साहित्यात, देशाची मूल्ये जपण्यात आणि चालू असलेले प्रश्न समजावून सांगण्यात हिंदीचे योगदान लक्षवेधी आहे. भारत हा विविध संस्कृती, भाषा आणि बोलीभाषांचा देश आहे. या देशाच्या विविधतेचे सौंदर्य त्याच्या एकतेत आहे. देशाच्या उत्तर भागात हिंदी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. हिंदी भाषिकांच्या योगदानाचा, भाषेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि जगभर तिची पुरेशी ओळख व्हावी यासाठी दरवर्षी १० जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. या दिनाविषयी काही खास गोष्टी जाणून घ्या.

जागतिक हिंदी दिवसाचा इतिहास

१९४९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पहिल्यांदा हिंदी बोलली गेली. २००६ मध्ये पहिला विश्व हिंदी दिवस देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी साजरा केला. तेव्हापासून १० जानेवारी हा दिवस सर्वत्र जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक हिंदी दिवसाचे महत्त्व

हिंदी ही भारत सरकारची अधिकृत भाषा मानली जाते. तसेच इंग्रजी व्यतिरिक्त भारत संघराज्याची अधिकृत भाषा देखील आहे. जागतिक हिंदी दिन साजरा करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे भाषेचे महत्त्व वाढविणे आणि लोकांना त्यांच्या बोलण्यात, भाषणात, परफॉर्मन्समध्ये, संगीत आणि नाट्यकलेत हिंदीचा समावेश करण्याचे आवाहन करणे हे आहे. जगाच्या सांस्कृतिक आणि भाषिक परिदृश्यात हिंदी महत्त्वाची भूमिका बजावते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel