World Hepatitis Day 2024: कोणाला असतो हिपॅटायटीसचा धोका? जाणून घ्या याची लक्षणं आणि कारणं
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Hepatitis Day 2024: कोणाला असतो हिपॅटायटीसचा धोका? जाणून घ्या याची लक्षणं आणि कारणं

World Hepatitis Day 2024: कोणाला असतो हिपॅटायटीसचा धोका? जाणून घ्या याची लक्षणं आणि कारणं

Published Jul 26, 2024 11:11 PM IST

Hepatitis Symptoms and Causes: वर्ल्ड हिपॅटायटीस डे निमित्त जाणून घ्या काय आहेत या आजाराची लक्षणे. तसेच कोणाला हिपॅटायटीस होण्याची जास्त भीती असते आणि बचाव कसा करावा हे पाहा.

हिपॅटायटीसची लक्षणं आणि कारणं
हिपॅटायटीसची लक्षणं आणि कारणं (freepik)

Who are Highly Risk of Hepatitis: वर्ल्ड हिपॅटायटीस डे दरवर्षी २८ जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांमध्ये या जीवघेण्या आजाराविषयी जनजागृती करणे हा आहे. कारण हिपॅटायटीसची लस घेऊनही अनेकांना या गंभीर संसर्गजन्य आजाराने ग्रासले आहे. हिपॅटायटीस हा यकृतातील सूज येण्याचा आजार आहे, जो व्हायरस किंवा इतर कारणांमुळे होतो. चला तर मग जाणून घेऊया कोणाला हिपॅटायटीस आजाराचा धोका असतो. तसेच याचे लक्षणं आणि बचाव कसा करावा.

हिपॅटायटीसचे अनेक प्रकार आहेत

हिपॅटायटीस हा आजार अनेक प्रकारात विभागला जातो. ज्यात ए, बी, सी, डी, ई, ऑटोइम्यून आणि अल्कोहोलिक हिपॅटायटीसचा समावेश आहे.

सर्वात धोकादायक असतो हिपॅटायटीस सी

हिपॅटायटीसच्या एवढ्या प्रकारात सर्वात धोकादायक आजार म्हणजे हिपॅटायटीस सी आहे. ज्याचा परिणाम शरीरात बराच काळ दिसून येतो. जेव्हा यकृत खराब होतो किंवा लिव्हर सिरोसिस, यकृत कर्करोग होतो. ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.

या कारणांमुळे असतो हिपॅटायटिसचा धोका

हिपॅटायटीस होण्यासाठी काही कारणे जबाबदार असू शकतात.

- दीर्घकालीन अल्कोहोलचे व्यसन हिपॅटायटीसला बळी पडू शकते.

- काही औषधे यकृताच्या कार्यावर परिणाम करतात आणि यकृतावर सूज येते. ज्यामुळे हिपॅटायटीस आजाराचा धोका असतो.

हिपॅटायटीस ए आणि ई चा धोका

- घाण पाणी आणि अशुद्ध अन्न यामुळे हिपॅटायटीस ई आणि ए चा धोका असतो.

- हिपॅटायटीस बी, सी आणि डी हे संसर्गजन्य आजार आहेत जे रक्त, शरीरातील फ्लूइड, सीमन यांच्या माध्यमातून एकाकडून दुसऱ्या कडे पसरतात. हे संक्रमित इंजेक्शनच्या वापराने होते.

या लोकांना असतो हिपॅटायटीस होण्याचा धोका

- घाणेरडे आणि विषारी अन्न खाल्ल्याने हिपॅटायटीसचा धोका असतो.

- याशिवाय जे लोक हिपॅटायटीस बाधित भागात जातात त्यांना हिपॅटायटीसचा आजार होण्याचा धोका असतो.

- नियमित रक्तदान करणाऱ्यांमध्ये सुद्धा हिपॅटायटीसचा धोका असतो.

- वारंवार होणाऱ्या ब्लड ट्रान्सफरमुळे सुद्धा हा आजार होतो.

- टॅटू आणि सिरिंजच्या पुनर्वापरामुळे देखील हिपॅटायटीसचा धोका असतो.

- एचआयव्ही संसर्गासह हिपॅटायटीसचा धोका असतो.

- जास्त काळ मद्यपान केल्याने हिपॅटायटीसचा आजार होतो.

- ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते आणि हिपॅटायटीस हा ऑटोइम्यून आजार आहे.

हिपॅटायटीसची लक्षणे

- हिपॅटायटीसमुळे तीव्र ताप येतो.

- सांधे आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना

- ओटीपोटात दुखणे

- नेहमी आजारी असल्याची भावना

- अशक्तपणा

- भूक न लागणे

- उलट्या आणि चक्कर येणे

- डायरिया

- त्वचेवर खास येणे

- कावीळ प्रमाणे त्वचा आणि डोळे पिवळे होणे

- गडद पिवळे मूत्र

- ग्रे कलरचे स्टूल

- पायांना सूज येणे

- उलटी आणि मल मध्ये रक्त येणे

- मेंदू काम न करणे आणि कंफ्यूजन

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner