World Health Day: ऑफिसमधून आल्यावर करा या गोष्टी, निरोगी राहण्यास होईल मदत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Health Day: ऑफिसमधून आल्यावर करा या गोष्टी, निरोगी राहण्यास होईल मदत

World Health Day: ऑफिसमधून आल्यावर करा या गोष्टी, निरोगी राहण्यास होईल मदत

Apr 06, 2024 11:22 PM IST

World Health Day 2024: दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांचे आरोग्य राखणे हा आहे. ऑफिसच्या कामामुळे आरोग्याशी तडजोड करत असाल तर या गोष्टी नक्की करा.

World Health Day: ऑफिसमधून आल्यावर करा या गोष्टी, निरोगी राहण्यास होईल मदत
World Health Day: ऑफिसमधून आल्यावर करा या गोष्टी, निरोगी राहण्यास होईल मदत (unsplash)

Things to Do After Office Hours: वर्क लाइफ बॅलेंस राखण्यासोबतच आरोग्य राखणे सुद्धा खूप गरजेचे आहे. लोकांना स्वतःला निरोगी ठेवता यावे यासाठी जागतिक आरोग्य दिनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन (world health day) साजरा केला जातो. मात्र ऑफिसच्या कामामुळे अनेकदा लोक त्यांच्या आरोग्याशी तडजोड करतात. स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल तर ऑफिसमधून आल्यावर या गोष्टी करा.

डिव्हाइस अनप्लग करा

घरी आल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अनप्लग करा. तसेच ऑफिशियल ईमेल्स आणि नोटिफिकेशन्स न बघण्याची सवय लावा. स्वतःसाठी सीमा निश्चित करा आणि स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा.

फिजिकल अॅक्टिव्हीटीमध्ये गुंतवा

संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वत:ला शारीरिक हालचालींमध्ये गुंतवून घ्या. संध्याकाळी व्यायाम केल्याने तणावापासून आराम मिळतो. हलका वॉक, योगा किंवा जिम करा.

तुमचा छंद किंवा आवडीचे काम करा.

तुमचा छंद पूर्ण करण्यासाठी तुमचा मोकळा वेळ वापरा. तुमचे आवडते काम केल्याने मनाला आनंद मिळतो आणि सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. ज्यामुळे तणाव दूर होतो. बागकाम असो, पेंटिंग असो, कुकिंग असो किंवा म्युझिक ऐकणे असो अशा गोष्टी करा.

कुटुंबाला वेळ द्या

तुमच्या मोकळ्या वेळेत तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी बोला. मित्र, पालक किंवा तुम्हाला ज्याच्याशी बोलायला आवडते त्यांच्यासोबत गप्पा मारा. त्याच्याशी थोडे संभाषण आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल.

ध्यान करा

तुम्ही ध्यानासाठी अध्यात्माची मदत देखील घेऊ शकता. किंवा अगदी योगा, श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकता. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत आणि संतुलित वाटेल.

स्वत:ची काळजी घ्या

काही काळ कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी करू नका आणि फक्त स्वत:ची काळजी घ्या. ज्यामध्ये तुम्ही आराम करा, रिलॅक्स व्हा किंवा तुमच्या शरीराला स्वच्छ करा आणि पोषण करा.

पुढच्या दिवसाचा प्लॅन बनवा

झोपण्यापूर्वी तुमच्या दिवसभराच्या कामाचा विचार करा आणि नवीन दिवसाची प्लॅनिंग करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner