मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Health Day: जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा उद्देश काय? जाणून घ्या वर्ष २०२४ ची थीम

World Health Day: जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा उद्देश काय? जाणून घ्या वर्ष २०२४ ची थीम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 07, 2024 10:23 AM IST

World Health Day 2024: दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. माय हेल्थ, माय राइट्स ही यंदाची थीम आहे. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात का झाली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

World Health Day: जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा उद्देश काय? जाणून घ्या वर्ष २०२४ ची थीम
World Health Day: जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा उद्देश काय? जाणून घ्या वर्ष २०२४ ची थीम (freepik)

History and Theme of World Health Day: जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि आरोग्याशी संबंधित अधिकारांबद्दल जागरूक केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल १९५० मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास

जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापने बरोबरच जागतिक आरोग्य दिनाचीही पायाभरणी झाली. जगातील अनेक देशांनी आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांना गंभीर आजारांपासून जागरूक आणि सुरक्षित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. जागतिक आरोग्य दिन १९५० मध्ये स्थापन झाल्यानंतर दोन वर्षांनी प्रथमच साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी आरोग्य दिन साजरा करण्यासाठी एक वेगळी थीम तयार केली जाते.

जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?

जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. डब्युएचओ (WHO) ची स्थापना करण्याचा उद्देश आरोग्याच्या दृष्टीकोनातून जीवनाचा दर्जा सुधारणे हा होता. तसेच आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करणे आणि प्रत्येकाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश होता. हे उद्दिष्ट अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

वर्ष २०२४ ची थीम काय आहे?

जागतिक आरोग्य दिन २०२४ ची थीम माझे आरोग्य, माझे हक्क (My Health My Right) आहे. या वर्षीची थीम जगभरातील आरोग्य समस्या आणि संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आली आहे. प्रत्येकाला अत्यावश्यक आरोग्य सेवा, आरोग्य शिक्षण आणि संबंधितमाहिती सर्वत्र मिळावी, हा ही थीम तयार करण्याचा उद्देश आहे. शुद्ध पिण्याचे पाणी, शुद्ध हवा, आवश्यक पोषण, राहण्यासाठी चांगले घर, चांगले वातावरण आणि काम करण्याची परिस्थिती हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. आणि हाच विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने २०२४ सालासाठी जागतिक आरोग्य दिनाची थीम ठेवली आहे - माझे आरोग्य, माझे हक्क.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel