World Food Safety Day: जगभरात का साजरा केला जातो जागतिक अन्न सुरक्षा दिन? हा आहे इतिहास
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Food Safety Day: जगभरात का साजरा केला जातो जागतिक अन्न सुरक्षा दिन? हा आहे इतिहास

World Food Safety Day: जगभरात का साजरा केला जातो जागतिक अन्न सुरक्षा दिन? हा आहे इतिहास

Jun 15, 2024 12:11 PM IST

World Food Safety Day 2024: जगभरात ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याच्या उद्देशासोबतच त्याचा इतिहास जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

जागतिक अन्न सुरक्षा दिन
जागतिक अन्न सुरक्षा दिन (unsplash)

World Food Safety Day History and Significance: दरवर्षी ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना अन्न सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे हा आहे. अन्न सुरक्षा दिन अन्नापासून उद्भवणारा कोणताही धोका कमी करण्यासाठी आणि टाळण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश प्रत्येकाला स्वच्छ, सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न मिळावे हा आहे. जगभरात पसरलेली भूक आणि गरिबी लक्षात घेऊन या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

काय आहे जागतिक अन्न सुरक्षा दिनाचा इतिहास

जागतिक अन्न सुरक्षा दिन १८ डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने अन्न आणि कृषी संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने स्थापन केला. हा दिवस पहिल्यांदा ७ जून २०१९ रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आरोग्य, भूक आणि शेतीशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्याबरोबरच अन्न सुरक्षेच्या गरजांकडे लक्ष वेधणे हा होता.

का महत्त्वाचा आहे जागतिक अन्न सुरक्षा दिन?

अन्न सुरक्षा हा कोणत्याही सामान्य जनतेचा मूलभूत अधिकार आहे. गलिच्छ आणि असुरक्षित अन्नामध्ये हानिकारक जीवाणू, विषाणू, परजीवी आणि रसायने असतात, ज्यामुळे सुमारे २०० रोग होऊ शकतात. ज्यामध्ये डायरियापासून कॅन्सरपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दूषित अन्न खाल्ल्यानंतर दरवर्षी सुमारे ६ दशलक्ष लोक आजारी पडतात. त्याच वेळी दूषित अन्नामुळे सुमारे चार लाख वीस हजार मृत्यू झाले आहेत. अन्नामुळे होणारे आजार अनेक लोकांवर परिणाम करतात. यामध्ये लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि खराब आरोग्य असलेल्यांचा समावेश आहे.

जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट

जागतिक अन्न सुरक्षा दिनाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा आहे. जेणेकरुन लोकांना जाणीव होईल की ते खात असलेले अन्न स्वच्छ आणि सुरक्षित, खाण्यायोग्य आहे की नाही? यासोबतच स्वच्छ खाण्याची सवय व्हावी यासाठी सरकार, व्यवसायी आणि ग्राहकांना कृती करण्यास प्रेरित करणे हा सुद्धा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. तसेच शेतात आणि उत्पादन करताना अन्न स्वच्छ असावे. २०२४ मधील जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम - अन्न सुरक्षा: अनपेक्षितांसाठी अन्न तयार करा अशी आहे.

Whats_app_banner