World Food Safety Day: या कुकिंग आणि स्टोरेज पद्धती ठेवू शकतात आपले अन्न सुरक्षित, चुकवू नका
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Food Safety Day: या कुकिंग आणि स्टोरेज पद्धती ठेवू शकतात आपले अन्न सुरक्षित, चुकवू नका

World Food Safety Day: या कुकिंग आणि स्टोरेज पद्धती ठेवू शकतात आपले अन्न सुरक्षित, चुकवू नका

Published Jun 07, 2024 01:44 PM IST

World Food Safety Day 2024: नीट झाकण असलेल्या कंटेनरमध्ये साठवण्यापासून ते कच्चे आणि शिजवलेले अन्न मिक्स न करण्यापर्यंत येथे काही कुकिंग आणि स्टोअरिंगच्या काही पद्धती आहेत.

जागतिक अन्न सुरक्षा दिन
जागतिक अन्न सुरक्षा दिन (Unsplash)

Best Cooking And Storage Ways to Keep Food Safe: दरवर्षी अनेक जण अन्न प्रदूषणाला बळी पडतात. स्वयंपाकाच्या पद्धती, साठवणुकीची समस्या किंवा अपुरे नियंत्रण किंवा अन्न भेसळीमुळे असो, अन्न सुरक्षेच्या घटना लोकांवर परिणाम करू शकतात. आपण जे खातो त्यामुळे आपल्याला आजार होण्याची शंका असलेल्या परिस्थितीला फूड पॉइजनिंग म्हणतात. अपघात, जेवण नीट न बनवणे, भेसळयुक्त अन्न विकणे किंवा अतिवृष्टी सारख्या कारणांमुळे असे घडू शकते. जागतिक आरोग्य संघटना म्हणते अन्न विषारी होण्यापासून वाचण्यासाठी सरकार, अन्न तपासणी करणारे, शेतकरी आणि जेवणाचे दुकान चालवणारे यांनी खूप मेहनत करावी लागते, पण आपण सर्वसामान्य लोकही काळजी घेऊन यात मदत करू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर स्पष्ट केले आहे.

अन्न सुरक्षिततेचे महत्त्व पुन्हा स्थापित करण्यासाठी आणि निरोगी स्वयंपाक आणि साठवणुकीच्या पद्धतींचा सराव करण्यासाठी दरवर्षी ७ जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो.

हेल्दी कुकिंग आणि स्टोअरिंग पद्धती ज्या अन्न सुरक्षित ठेवू शकतात:

कमी तापमानात ठेवा

जर ताज्या शिजवलेल्या अन्नातून शिल्लक राहिले असेल आणि आपल्याला ते दुसऱ्या दिवसासाठी साठवण्याची आवश्यकता असेल तर आपण त्यांना फ्रिजमध्ये ठेवले पाहिजे. अतिजोखमीचे अन्नपदार्थ ५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात साठवावेत. यामुळे अन्न विषबाधा होण्यापासून किंवा खराब होण्यापासून अन्न सुरक्षित राहते.

झाकलेले कंटेनर

खाद्यपदार्थ ज्या डब्यात साठवायचे असेल ते डबे व्यवस्थित झाकलेले व टाईट केलेले आहेत याची खात्री करून घ्यावी. झाकण नसलेले, सैलपणे झाकलेले कंटेनर किंवा कंटेनर दूषित होऊ शकतात.

मिक्स करू नका

कच्चे आणि शिजवलेले अन्न कधीही एकत्र मिसळू नये. शिजवलेले अन्न वेगळ्या डब्यात ठेवण्याची खात्री करावी. शिजवलेल्या अन्न पदार्थांच्या खाली कच्चे खाद्यपदार्थ ठेवावेत.

चांगले शिजवा

स्वयंपाक करताना आपण अन्न पदार्थ चांगले तळून घ्यावेत, किंवा खाण्यापूर्वी किंवा पुढील वापरासाठी साठवण्यापूर्वी ते व्यवस्थित उकळून घ्यावेत.

मांस आणि मासे

मांस किंवा मासे शिजवण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी आपण ते पाण्याने व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजे आणि रक्त आणि स्केल्स काढून टाकले पाहिजेत. सेवन करण्यापूर्वी ते व्यवस्थित शिजवले पाहिजेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner