World Environmental Health Day 2023: तुमच्या छोट्या सवयींमधील बदल वाचवेल पर्यावरण, भविष्यातील धोक्यापासून होईल रक्षण
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Environmental Health Day 2023: तुमच्या छोट्या सवयींमधील बदल वाचवेल पर्यावरण, भविष्यातील धोक्यापासून होईल रक्षण

World Environmental Health Day 2023: तुमच्या छोट्या सवयींमधील बदल वाचवेल पर्यावरण, भविष्यातील धोक्यापासून होईल रक्षण

Published Sep 26, 2023 11:11 AM IST

Tips To Save Environment: पर्यावरण वाचवण्यासाठी मोठे काही करण्यापेक्षा आपल्या काही सवयींमध्ये छोटा बदल करणे पुरेसे आहे. जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त पर्यावरण वाचवण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या.

जागतिक पर्यावरण आरोग्य दिन - पर्यावरण वाचवण्यासाठी सवयी
जागतिक पर्यावरण आरोग्य दिन - पर्यावरण वाचवण्यासाठी सवयी (unsplash)

Habits Change to Save Environment: पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ आपली जबाबदारी नाही तर ते आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गाचा आणि पर्यावरणाचा एवढा नाश केव्हा केला ते आपल्या लक्षातही आलं नाही. या चुकीचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहेत. काही ठिकाणी शहरे कोरडी पडत आहेत तर काही ठिकाणी पुरासारखी आपत्ती निर्माण झाली आहे. पर्यावरणाचा सर्व बाजूने ऱ्हास झाला असून, निसर्गाचे चक्र बदलले आहे. एवढे करूनही आपण निसर्गाची हानी करणे थांबवलेले नाही. अशा परिस्थितीत जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त जाणून घ्या पर्यावरण वाचवण्याचे सोपे उपाय.

पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर

आपल्या स्वतःच्या कारमधून फिरायला प्रत्येकालाच आवडते. पण यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करू शकता. किंवा तुम्ही पायी चालणे, सायकल वापरणे किंवा बाईक वापरू शकता. हे केवळ तुमचा कार्बन फूटप्रिंट कमी करणार नाही तर तुम्हाला थोडा व्यायाम करण्यास आणि तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल.

वीज वाचवा

तुमचा वीज वापर कमी करणे हा पर्यावरणाचे रक्षण करण्याचा सोपा मार्ग आहे. जेव्हा गरज नसेल तेव्हा लगेच लाइट बंद करा आणि इलेक्ट्राॉनिक्स अनप्लग करा. असे केल्याने आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकाल.

झाडे लावा

झाडे लावा आणि त्याची काळजी घ्या. वर्षातून एक झाड लावणे हा पर्यावरणाला हातभार लावण्याचा सोपा मार्ग आहे. झाडे पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ज्यामुळे ग्रीन हाऊस गॅस प्रदूषण कमी करते. याव्यतिरिक्त झाडे सावली देतात, जे तुमचे घर थंड करण्यासाठी चांगले आहे.

 

सिंगल युज प्लास्टिक वापरणे टाळा

प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बॉटल आणि भांडी यांसारखे एकदा वापरता येणारे म्हणजे सिंगल युज प्लास्टिक प्रदूषण वाढवतात. प्लास्टिक प्रोडक्ट वापरणे कमी करा किंवा अजिबात वापरू नका. त्याऐवजी काचेच्या किंवा धातूच्या कंटेनरमध्ये उपलब्ध उत्पादने खरेदी करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner