Emojis to Improve Relationship: इमोजी आले आणि आपले बोरिंग चॅट मनोरंजक झाले. विशेष म्हणजे यामुळे आपल्याला जाणवत असलेल्या भावन संवाद साधताना प्रभावीपणे व्यक्त करण्याचा एक पर्यायी मार्ग सापडला. आपल्या दैनंदिन जीवनात इमोजी वापरण्याचे महत्त्व लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी वर्ल्ड इमोजी डे साजरा केला जातो. टेक्स्ट मॅसेज, व्हॉट्सअॅप मॅसेज आणि इतर सोशल मीडिया फॉरमॅटमुळे इमोजी अगदी सहजतेने आपल्या जीवनाचा एक भाग बनले. आता तर इमोजी न वापरता मॅसेजद्वारे संवाद साधण्याचा आपण विचारच करू शकत नाही.
१७ जुलै रोजी वर्ल्ड इमोजी दिवस साजरा करण्याचे मनोरंजक कारण आहे. एक कॅलेंडर इमोजी उपलब्ध आहे, तर बहुतेक अॅप्लिकेशनमध्ये १७ जुलै दाखवते, म्हणून त्या दिवशी जागतिक इमोजी दिवस साजरा केला जातो. सहसा या दिवशी प्रोडक्टची घोषणा किंवा इमोजीशी संबंधित प्रकाशन केले जाते. इमोजी आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यात मदत करतात. येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे इमोजी तुमचे नाते सुधारू शकतात
समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचे लोकांचे वेगवेगळे मार्ग असतात. कंफ्यूजन टाळण्यासाठी आणि आपण काय सांगायचं प्रयत्न करत आहोत हे समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे समजले आहे याची खात्री करण्यासाठी आपण मजकुरासह इमोजी वापरू शकतो.
मित्रांसोबतचे प्लॅन रद्द करण्यासाठी किंवा इतरांशी असहमत असलेले मुद्दे मांडण्यासाठी किंवा अवघड, कठोर वाटणाऱ्या गोष्टी शेअर करण्यासाठी इमोजी प्रभावी ठरते. इमोजी तुमच्या भावना व्यक्त करण्यात आणि शेअर करण्यास अवघड वाटणाऱ्या विधान सौम्य करण्यास मदत करू शकतात.
असे दिसून आले आहे की जेव्हा रचनात्मक टीका करण्याचा विचार येतो तेव्हा इमोजी परिस्थिती सौम्य करण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीला पुरेसे सक्षम वाटण्यासाठी चांगले कार्य करते.
इमोजी सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यास मदत करतात. जेव्हा आपण आपले वाक्य सकारात्मक इमोजीसोबत अपडेट करतो तेव्हा ते आपल्याला समोरच्या व्यक्तीशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होण्यास मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या