Emoji Actual Meaning: दरवर्षी १७ जुलै रोजी जगभरात वर्ल्ड इमोजी डे साजरा केला जातो. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या या काळात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा खूप वापर केला जातो. इमोजीमुळे आपला संवाद इतका सोपा झाला आहे की अनेक स्मार्टफोन कीबोर्ड आपण टाइप केलेल्या शब्दानुसार इमोटिकॉन्स सुचवतात. खरं तर आज असा कोणी नसेल जो इमोजी वापरत नसेल. अगदी एखाद्या सोबत बोलताना असो किंवा एखादी पोस्ट करताना वेगवेगळ्या इमोजीचा वापर केला जातो. वेगवेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी या इमोजी वापरल्या जातात.
खरं तर इमोजींची एक लांबलचक यादी आहे ज्याचा अर्थ आपण आजपर्यंत चुकीचा समजत आलो आहोत. म्हणजे आपण एखादी भावना व्यक्त करण्यासाठी, एखादा विचार करून इमोजी पाठवतो असतो, पण प्रत्यक्षात त्याचा अर्थ तो नसतो तर दुसराच काही असतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच ५ इमोजींबद्दल सांगत आहोत, जे आपण वेगळा विचार करून वापरतो. हे इमोजी आपण भरपूर वापरत असलो तरी याचा अर्थ अजिबात तसा नाही जसा आपण विचार करतो. चला तर मग जाणून घ्या या इमोजीचा खरा अर्थ.
Sleepy Face
या इमोजीमध्ये चेहऱ्यासोबत एक बबल दिसून येतो. बरेच लोक या बबलला अश्रू समजतात आणि या इमोजीला रडण्याशी जोडतात. पण प्रत्यक्षात हा स्लीप फेस इमोजी आहे. म्हणजे हा झोपलेला चेहरा आहे.
Folded Hands
बरेच लोक हात जोडलेला म्हणजे नमस्काराच्या इमोजीची तुलना प्रार्थना किंवा हाय-फाइव्हशी करतात. तथापि हे जपानी संस्कृतीवर आधारित "प्लीज" किंवा "धन्यवाद" वर आधारित आहे.
Person Gesturing Ok
बरेच लोक या इमोजीचा वापर चूक झाल्यावर किंवा मिस्टेकसाठी वापरतात. पण याचा अर्थ ओके असा आहे.
Person Bowing Deeply
अनेक युजर्स या इमोजीला झोप येणे किंवा बोअर होत असल्याचे, कंटाळा येण्याचे लक्षण मानतात सांगण्याचे वापरतात. पण हा आदर, सन्मानासाठी वापरला जाणारा इमोजी आहे. याला नतमस्तक चिन्ह किंवा bowing sign म्हणतात. चीनमध्ये याचा अर्थ असा होतो की आपण एखाद्याला आदर देत आहात.
Weary Cat
या इमोजीमध्ये मांजरीचा चेहरा आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येते. अशा वेळी एखाद्या गोष्टीला 'सरप्राइज' देण्यासाठी किंवा आश्चर्य वाटले हे सांगण्यासाठी लोक या इमोजीचा वापर करतात. पण प्रत्यक्षात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी कंटाळला आहे किंवा थकला आहे.
संबंधित बातम्या