Meaning Of All Colors Heart Emoji: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इमोजीचा वापर केला जातो. चॅटिंग दरम्यान विविध प्रकारचे इमोजी वापरले जातात. तुम्हाला तुमच्या मॅसेजमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील भाव दाखवायचे असतील तर तुम्ही इमोजी वापरू शकता. मॅसेज पाठवताना इमोजी वापरणे ही प्रत्येकाची सवय झाली आहे आणि काही लोकांना त्याच्याशिवाय बोलणे अशक्य वाटते. समोरच्या व्यक्ती विषयी प्रेम दाखवण्यासाठी हार्ट इमोजीचा वापर केला जातो. पण तुम्हाला या लिस्ट मध्ये कितीतरी रंगांचे हार्ट दिसतील. या प्रत्येक रंगांचा वेगळा अर्थ आहे. १७ जुलै हा जागतिक इमोजी दिवस म्हणून साजरा केला जातो. या खास दिनाला जाणून घेऊया या वेगवेगळ्या रंगांच्या हार्ट इमोजीचा अर्थ काय आहे.
लाल हार्ट - प्रेम किंवा रोमान्स दर्शवते.
ऑरेंज हार्ट - हे दोन मित्रांमधील प्रेमाशी संबंधित आहे.
पिवळे हार्ट - मैत्रीशी संबंधित आहे, खरे प्रेम दाखवते.
ग्रीन हार्ट - निरोगी आणि निसर्गाशी संबंधित प्रेम दर्शवते.
ब्लू हार्ट - विश्वास आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे.
जांभळा हार्ट - निषिद्ध प्रेम, विशेषत: ते प्रेमींसाठी आहे.
ब्लॅक हार्ट - हे दुःख आणि वेदना दर्शवते.
व्हाइट हार्ट - प्रेम आणि आपुलकी व्यतिरिक्त हे शोक व्यक्त करण्यासाठी देखील वापरले जाते.
ब्राउन हार्ट - वांशिक ओळख संबंधित समस्यांच्या चर्चेसाठी वापरले जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या