मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Digestive Health Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे? वाचा इतिहास आणि महत्त्व

World Digestive Health Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे? वाचा इतिहास आणि महत्त्व

May 29, 2024 10:21 AM IST

World Digestive Health Day 2024 Theme: जागतिक पाचक आरोग्य दिन दरवर्षी २९ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे खराब पचनामुळे होणाऱ्या आजारांबद्दल लोकांना जागरूक करणे. या दिवसाचा इतिहास आणि यावर्षीची थीम जाणून घ्या.

वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे - इतिहास, महत्त्व आणि थीम
वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे - इतिहास, महत्त्व आणि थीम (freepik)

World Digestive Health Day History and Significance: खराब पचनशक्ती आणि अन्न पचण्याशी संबंधित अनेक समस्या लोकांना दररोज त्रास देतात. बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडीटी, छातीत जळजळ, जुलाब, अपचन, ब्लोटिंग या समस्यांना बहुतांश लोकांना सामोरे जावे लागते. या पचनाच्या समस्या दीर्घकाळ राहिल्यामुळे इतर अनेक आजार उद्भवतात. अशा परिस्थितीत लोकांना पचनसंस्थेबाबत माहिती असणे गरजेचे आहे. दरवर्षी २९ मे रोजी जागतिक पाचक आरोग्य दिन (World Digestive Health Day) साजरा केला जातो. पचनाच्या आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे हा त्यामागचा उद्देश आहे. लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग आणि इतर पचन समस्यांबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरुन लोक त्यांची पचनशक्ती शक्य तितकी सुधारू शकतील आणि निरोगी जीवनशैली जगू शकतील.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे जागतिक पाचक आरोग्य दिन २०२४ची थीम (world digestive health day 2024 theme)

वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे २०२४ ची थीम योर डायजेस्टिव्ह हेल्थः मेक इट अ प्रायोरिटी (Your Digestive Health: Make It a Priority) अशी आहे.

जागतिक पाचक आरोग्य दिनाचा इतिहास (world digestive health day history)

जागतिक पाचक आरोग्य दिन साजरा करणे २००४ मध्ये वर्ल्ड गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऑर्गनायझेशनच्या अधिकृत स्थापनेपासून सुरू झाले. जीआय आजाराने ग्रस्त लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. अशा परिस्थितीत जागतिक पाचक आरोग्य दिनानिमित्त जनजागृती केली जाते. जेणेकरून लोकांना जीआय आजारांवर योग्य उपचार मिळू शकतील.

जागतिक पाचक आरोग्य दिन साजरा करण्याचा उद्देश (world digestive health day significance)

वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे साजरा करण्याचे हे उद्दिष्ट आहेत

- जागतिक पाचक आरोग्य दिन ही लोकांना जीआय रोगांबद्दल जागरूक करण्याची संधी आहे.

- यासोबतच लोकांना सकस आहार आणि व्यायामासाठी प्रोत्साहन देणे आहे.

- जागतिक पाचक आरोग्य दिनाच्या मदतीने, ते लोकांना निरोगी जीवनशैली जगण्यास प्रेरित करते.

WhatsApp channel