Health Benefits of Coconut: नारळ हे असे फळ आहे जे प्रत्येक जण आवडीने खातो. हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे. नारळामध्ये कार्ब्स, प्रोटीन, मॅगनीज आणि तांबे या खनिजांचे प्रमाण भरपूर असते. हे दररोज खाल्ल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळू शकतात. हे सर्वात आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे जे आपण स्नॅक टाइममध्ये खाऊ शकता. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. दरवर्षी २ सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन (world coconut day) साजरा केला जातो. या दिनानिमित्त जाणून घ्या नारळ खाण्याचे फायदे
नारळाची क्रीम म्हणजेच मलई खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते. यात असलेले एमसीटी वजन कमी करण्याशी जोडले गेले आहेत. कारण ते उर्जा वाढवू शकतात आणि भूक कमी करू शकतात. स्नॅकच्या वेळी तुम्ही नारळ खाऊ शकता.
नारळात मॅगनीज आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. हे खाल्ल्याने शरीरातील कोणत्याही आरोग्याच्या समस्या टळतात. कारण यात अँटीवायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.
जर तुम्ही आपल्या आहारात फायबरचा समावेश केला तर तुमची पचनक्रिया नेहमीच योग्य राहील. नारळाच्या मलईमध्ये असलेले फायबर पचन नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. नारळाचा आतड्याच्या जीवाणूंवर सकारात्मक प्रभाव पडतो, निरोगी आतडे मायक्रोबायोमला प्रोत्साहन देते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना नारळ खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.
नारळाचा गर म्हणजेच खोबऱ्यामध्ये नारळाचे तेल असते, जे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करते. यासोबतच हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. हे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते.
नारळ पोषक तत्वांनी समृद्ध असतो. हे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे कारण यामुळे गर्भाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या वाढीस आणि विकासास मदत होते. यामुळे होणाऱ्या मातेची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)