3 Cocktails Recipes: १३ मे रोजी साजरा केला जाणारा जागतिक कॉकटेल दिवस (world cocktail day) हा कॉकटेलचा जागतिक उत्सव आहे. या दिवशी कॉकटेलच्या पहिल्या व्याख्येच्या प्रकाशनाची तारीख आहे. जागतिक स्तरावर आवडणारे कॉकटेल सामाजिक कार्यक्रमांना उंचावण्याच्या आणि अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. हे टेस्टी ड्रिंक सीमेपलीकडील लोकांना आनंद आणि उत्सवात एकत्र आणते. न्यूयॉर्क टॅब्लॉईड "द बॅलन्स अँड कोलंबियन रिपॉझिटरी" ने कॉकटेलचे वर्णन "एक उत्तेजक मद्य, साखर, पाणी आणि कडू अशा कोणत्याही प्रकारच्या स्पिरीटपासून बनलेले" म्हणून केले आहे. तुम्ही घरी सुद्धा सोप्या पद्धतीने कॉकटेल बनवू शकता. जागतिक कॉकटेल दिवस साजरा करण्यासाठी या ३ रेसिपी ट्राय करा.
(गप्पी - निशांत के गौरव - गप्पीचे लीड मिक्सॉलॉजिस्ट)
- व्हिस्की ४५ मिली
- एपेरॉल १० मिली
- अॅपल सोजू ३० मिली
- लिंबाचा रस ४-५ थेंब
- रोझ कॉर्डियाल ४५ मिली
एक उंच फॅन्सी ग्लास घ्या आणि थंड करण्यासाठी ठेवा. डिहायड्रेटेड गुलाबाच्या पाकळ्यांनी ग्लास सजवा. हे बनवण्यासाठी कॉकटेल मिक्सर वापरा. यात सर्व सामग्री एकत्र घाला. बर्फाचे तुकडे (६-७ सौम्य ढवळा) घालून चांगले ढवळा. ब्लॉक क्लिअर बर्फावर हे घाला. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा.
(निशांत के गौरव, गप्पीचे लीड मिक्सोलॉजिस्ट)
- जिन ४५ मिली
- मस्तिहा १५ मिली
- डाळिंब कॉर्डियाल ३० मिली
- पुदिन्याची पाने ४-५ पाने
- लिंबाचा रस १० मिली
- स्टिलबुंट ३-४ थेंब
एक कूप ग्लास घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा. कॉकटेल शेकरमध्ये सर्व साहित्य घाला. आईस क्यूब घालून चांगले शेक करा. नंतर ड्राय शेकसाठी दुसऱ्या शेकरमध्ये टाका. क्रीमी कंसिस्टंसी मिळविण्यासाठी ड्राय शेकमध्ये जोराने शेक करा. थंड ग्लासमध्ये बारीक स्ट्रेनरने गाळून घ्या. प्रिंट राईस पेपर आणि पुदिन्याच्या पानाने गार्निश करा.
- टकिला ब्लँको ६० मिली
- कोथिंबीर २-३
- जलापेनो पेपर १
- काकडीचा रस ५० मिली
चिमूटभर सेलरी सॉल्ट
सर्वप्रथम ताजी कोथिंबीर आणि जलपेनोस ब्लेंड करून घ्या. मिश्रण फिल्टर करा. मिश्रणात घरगुती काकडी कोल्ड प्रेसचा रस घाला. ताज्या लिंबाच्या रसाच्या आंबटपणाला पूरक म्हणून स्वीटनरचा समावेश करून मिश्रणाची आम्लता संतुलित करा. बर्फाच्या एका ब्लॉकवर सेलेरी सॉल्ट घालून ग्लासमध्ये सर्व्ह करा.